शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

वीजचोरीचा गोरखधंदा

By admin | Updated: February 2, 2015 01:06 IST

उपराजधानीत वीजचोरी उघडकीस आणण्याच्या नावाखाली गोरखधंदा होत आहे. लोकमतला मिळालेले दस्तावेजच याचे संकेत देत आहेत. वीजचोरी विरोधात उभारण्यात आलेली मोहीम चुकीची नाही.

वीजचोरीच्या प्रकरणांची नोंदणीच नाही : तथ्याशिवायच पंचनामाकमल शर्मा - नागपूर उपराजधानीत वीजचोरी उघडकीस आणण्याच्या नावाखाली गोरखधंदा होत आहे. लोकमतला मिळालेले दस्तावेजच याचे संकेत देत आहेत. वीजचोरी विरोधात उभारण्यात आलेली मोहीम चुकीची नाही. पण या निमित्ताने मोहिमेच्या नावावर होणारी सेटिंग थांबविण्याचा लोकमतचा प्रयत्न आहे. लोकमतला शुक्रवारी वीज वितरण फ्रॅन्चाईसी - एसएनडीएल द्वारा पकडलेल्या वीजचोरीच्या दस्तावेजाच्या मूळ प्रती मिळाल्या. नियमाप्रमाणे या प्रती एसएनडीएलच्या कार्यालयात असायला हव्यात. पण या प्रती सध्या लोकमतकडे आहेत. येथूनच हा गोरखधंदा असल्याचे स्पष्ट होते. या दस्तावेजांप्रमाणे १२ सप्टेंबर २०१४ ला एसएनडीएलच्या सतर्कता विभाग पथकाने सोमवारी क्वॉर्टर येथे वीजचोरीची दोन प्रकरणे पकडली. याचा दोन पंचासमोर पंचनामाही झाला. यातील एक पंचनामा निवासी एल-१ कनेक्शनचा आहे. यात निळ्या रंगाच्या तारेने मीटर बंद केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. दुसरा पंचनामा विमा रुग्णालयाजवळील परिसराचा आहे. जे व्यापारी कनेक्शन आहे यातही तार टाकून वीज चोरी होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. येथपर्यंत सारे ठीक असले तरी येथूनच गडबडीला प्रारंभ झाला आहे. पंचनाम्यात लोडचा कॉलम रिक्त ठेवण्यात आला आहे. नियमानुसार या कॉलममध्ये नोंद करणे आवश्यक आहे. वीजचोरी झाली तेथे तेथे किती वीज उपकरणे उपयोगात आणली याचा उल्लेख या कॉलममध्ये करणे आवश्यक आहे. याच आधारावर वीजचोरीचे मूल्यांकन आणि कम्पाउडिंग चार्ज निश्चित केला जातो. पण पंचनाम्यात याचा उल्लेखच नसल्याने या प्रकरणात काहीही केल्या गेले नाही, हे स्पष्ट आहे. हे सारे कंपनीच्या मर्जीने सुरू आहे वा पथकाचे लोक यात गडबड करीत आहे, हा संशोधनाचा विषय आहे. मोठी कारवाई करणार : एसएनडीएलवीज वितरण फ्रॅन्चाईसी - एसएनडीएलचे व्यवसाय प्रमुक सोनल खुराणा यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाची तपासणी करून दोषींविरोधात कडक पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. वीजचोरीच्या विरोधात राबविण्यात येणारे अभियान सर्वांच्याच हितासाठी आहे. याचा दुरुपयोग होऊ देणार नाही, असे खुराणा म्हणाले. लक्ष्य दोन कोटींचे आणि वीजचोरी पकडली ३९ लाखांचीचएसएनडीएलतर्फे वीजचोरीच्या विरोधात राबविण्यात येणारे अभियानच शंकेच्या घेऱ्यात सापडले आहे. कंपनीच्या सतर्कता पथकाला एका महिन्यात दोन कोटींची वीजचोरी पकडण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यात दुसरीकडे सरकारी कंपनी महावितरणने संपूर्ण जिल्ह्यात ३९ लाख रुपयांची वीजचोरी पकडली आहे. यामुळे एकतर महावितरण वीजचोरीसाठी गंभीर नाही वा एसएनडीएल अकारण वीजचोरीची प्रकरणे समोर आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.