शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

इलेक्ट्रिक बसमुळे ठामपाला दरमहा मिळणार १० लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: July 31, 2016 04:28 IST

ठाणे पालिका परिवहन सेवेच्या विस्कळीत कारभारामुळे, बसच्या वाईट अवस्थेमुळे ठाणेकरांना चांगली सेवा उपलब्ध होऊ शकलेली नाही.

ठाणे : ठाणे पालिका परिवहन सेवेच्या विस्कळीत कारभारामुळे, बसच्या वाईट अवस्थेमुळे ठाणेकरांना चांगली सेवा उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यावर मात करण्यासाठी आणि ठाणेकरांना उत्तम सेवा देण्यासाठी ठाणे महापालिका १०० इलेक्ट्रिक हायब्रीड बस घेणार आहे. पीपीपी तत्त्वावर या बस रस्त्यावर धावणार असल्या, तरी पालिकेला कोणताही खर्च न करता, उलट महिनाकाठी १०० बसपोटी १० लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. ठाणे पालिका परिवहन सेवेच्या (टीएमटी) ताफ्यात सध्या ३१३ बस असून, त्यातील १८० च्या आसपास बस प्रत्यक्षात रस्त्यावर धावत आहेत. त्यात नव्याने १९० बस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यातील काही बस लवकरच ताफ्यात दाखल होतील. सध्या ठाणेकरांना इतर सेवांवर अवलंबून राहावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन ठाणेकरांसाठी सेमी लो फ्लोअर इलेक्ट्रिक हायब्रीड बस घेतल्या जाणार आहेत. त्या पीपीपी तत्त्वावर असून, त्याचा पालिकेला काहीही खर्च नाही. या प्रकारच्या १०० बस घेण्याचा पालिकेचा मानस असून, पहिल्या टप्प्यात १० बस घेतल्या जातील. युरोपच्या धर्तीवर ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक बस धावत आहेत, त्याच पद्धतीचा अवलंब करून ठाण्यातही ही सेवा देण्याचा एका कंपनीचा मानस असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)>बस थांब्यांवर चार्जिंग पाँइंटस् उपलब्ध होणारया बस खासगी माध्यमातून घेतल्या जाणार असून, त्यावरील चालक, वाहक, चार्जिंग आॅपरेटर हे संबंधित एजन्सीचे असतील. पालिका केवळ त्यांच्यासाठी जागा देणार असून, बसच्या थांब्यांवर चार्जिंग सेंटर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आरटीआय नियमानुसार तिकिटाचे दर आकारण्यात येणार आहेत, परंतु यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून संबंधित ठेकेदार पालिकेला एका बसपोटी महिनाकाठी १० हजार रुपये देणार आहे. त्यानुसार, १०० बसपोटी १० लाखांचे उत्पन्न काही न करता पालिकेला मिळणार आहे. या बस घेण्याच्या प्रक्रियेला वेग येत असून, निविदा अंतिम करण्यासाठी येत्या स्थायी समितीच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ज्या १० बस येणार आहेत, त्यात मागील बाजूला संबंधित एजन्सी वाय-फाय स्टेशन अथवा लॅपटॉप आणि प्रिंटर अथवा इतर कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. त्याचे चार्जेस हे त्यांचे उत्पन्न असेल.