शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रिडिंग न घेताच दिले वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 02:51 IST

पनवेल विभागातील अनेक वीजग्राहकांना महावितरणकडून मीटर रिडिंग न घेताच अंदाजे वीज बिल पाठवले जात आहे.

कळंबोली : पनवेल विभागातील अनेक वीजग्राहकांना महावितरणकडून मीटर रिडिंग न घेताच अंदाजे वीज बिल पाठवले जात आहे. त्यानंतर एकदम अवाच्या सव्वा बिल धाडून ग्राहकांवर आर्थिक भार टाकला जात आहे. कळंबोलीत असा प्रकार सर्रास सुरू आहे. देयके भरण्याच्या तारखेनंतर काहींना बिल येत आहे आणि हे बिल न भरल्यास लगेच वीजपुरवठा खंडित केला जात आहे. पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली या ठिकाणी महावितरणची वीज यंत्रणा सातत्याने कोलमडते. कळंबोलीत तर वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होत असून केबल जळण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत. पनवेल आणि नवीन पनवेलमध्येही हीच स्थितीआहे. याशिवाय बिल आकारणीतही कमालीच्या त्रुटी आहेत. मीटरचा फोटो घेऊन रिडिंग अपडेट करणे, त्यानंतर बिल प्रिंट करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचविणे याकरिता महावितरण कंपनीने खासगी एजन्सी नियुक्त केल्या आहेत; परंतु कित्येक ग्राहकांना अंदाजे बिल पाठवले जात आहेत. काही बिलांमध्ये मागील युनिटचा समावेश करून भरमसाट बिल पाठवले जात आहे आणि ते भरण्यास विलंब झाल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. काही बिलांवर तर रिडिंग वेगळे, फोटो दुसरा तर बिल तिसऱ्याचेच पाठवले जात आहे. गेल्या महिन्यात पनवेलमधील अनेक ग्राहकांनी याबाबत विचारणा केली असता, आधी संपूर्ण वीज बिल भरा, त्यानंतर पुढे पाहू, असे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. वाढीव बिलाच्या तक्र ारी नेमक्या कुठे करायच्या, याबाबत काहीच माहिती दिली जात नाही. कळंबोलीतील ग्राहकांना खांदा वसाहतीत जाण्यास सांगितले जाते. कळंबोली सेक्टर १४ येथील आशीर्वाद सोसायटीतील युनिट क्र मांक ४ मधील ग्राहकाला सप्टेंबर महिन्याचे बिल अंदाजे देण्यात आले. त्यानंतर आॅक्टोबर महिन्यात दुप्पट बिल पाठविण्यात आले. बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याकरिता कर्मचारी धाडला, असे प्रकार कळंबोलीत अनेक ग्राहकांबाबत घडले आहेत. त्यामुळे ग्राहक त्रस्त आहेत. यासंदर्भात महावितरण कार्यकारी अभियंता डी.बी. गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)>वीज ग्राहकांना नोटिसा द्याअनेकदा वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे बिलामध्ये प्रचंड घोळ असतो. काही वेळेस ती बिले उशिरा वितरित केली जातात. या गोष्टीला महावितरण कंपनी जबाबदार आहे. तेव्हा वीजपुरवठा खंडित करीत असताना संबंधित ग्राहकांना नोटीस बजावणे गरजेचे असल्याचे मत पनवेलचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत महामुनी यांनी व्यक्त केले आहे.