शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

एसटी ताफ्यात येणार इलेक्ट्रिक बस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 07:00 IST

एसटी महामंडळाने भाडेतत्वावरील १५० ई-बस घेण्याचा निर्णय घेतला असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमुंबई, पुणे, नाशिक या शहरांना जोडणाऱ्या  मार्गांवर बस सुरू करण्याचा महामंडळाचा विचार एसटीच्या ताफ्यातील १८ हजारांहून अधिक बस राज्यभरात विविध मार्गांवर धावतात पुण्यामध्ये शहर बस वाहतुकीसाठी काही महिन्यांपुर्वी २५ ई-बस भाडेतत्वावर

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना आता लवकरच वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. महामंडळाने भाडेतत्वावरील १५० ई-बस घेण्याचा निर्णय घेतला असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक या शहरांना जोडणाऱ्या  मार्गांवर बस सुरू करण्याचा महामंडळाचा विचार असल्याचे समजते.एसटीच्या ताफ्यातील १८ हजारांहून अधिक बस राज्यभरात विविध मार्गांवर धावतात. या सर्व बस डिझेलवरील आहेत. मागील दीड-दोन वर्षामध्ये डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने एसटीला आर्थिक भार सहन करावा लागला आहे. ही दरवाढ सध्या स्थिर असली तरी डिझेलचा खर्च वाढत चालल्याने एसटीकडून इतर पर्यायांचा विचार सुरू करण्यात आला आहे. राज्यात बॅटरीवर चालणाऱ्या ईलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. पुण्यामध्ये शहर बस वाहतुकीसाठी काही महिन्यांपुर्वी २५ ई-बस भाडेतत्वावर घेण्यात आल्या. आणखी १५० बस लवकरच ताफ्यात दाखल होणार आहेत. इतर शहरांमध्येही ई-बसची मागणी आहे. केंद्र व राज्य सरकारकडून ई-बसला पसंती दिली जात आहे. यापार्श्वभुमीवर एसटीकडूनही ई-बस घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यामध्ये १५० वातानुकूलित ई-बस भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. एका बसची किंमत सुमारे २ कोटी रुपये एवढी आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वर्षअखेरीस या बस मार्गावर येण्याची शक्यता आहे. पण बसचे मार्ग अद्याप निश्चित झालेले नाहीत. असे असले तरी पुणे-मुंबई, मुंबई-नाशिक अशा मार्गांचा प्राधान्याने विचार होऊ शकतो, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. लांब पल्ल्याच्या मार्गावर ई-बस सुरू करण्यासाठी त्या मार्गावर तसेच बसचे सुरूवातीचे व अंतिम स्थानकावर चार्जिंग सेंटर उभारावी लागणार आहेत. याबाबतही चाचपणी करण्यात आल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले. -----------इलेक्ट्रिक बसबाबत शासनाचेही सकारात्मक धोरण आहे. भविष्यात याचाच वापर जास्त होणार आहे. म्हणून एसटी महामंडळानेही ईलेक्ट्रिकडे वळण्याचा निर्णय घेतला. सध्या १५० बस घेण्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कोणत्या मार्गावर सोडायच्या याबाबतचा निर्णय घेण्यात घेण्यात आलेला नाही. तसेच बस कधीपर्यंत मिळतील, हे अद्याप निश्चित नाही. - रणजितसिंह देओलव्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ------------ई-बसचे फायदे -- इंधन खर्च कमी होणार- वातानुकूलित बसमुळे प्रवाशांचा सुसह्य प्रवास- प्रदुषणविरहित- देखभाल-दुरूस्तीचा खर्च कमी

टॅग्स :PuneपुणेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सstate transportएसटी