शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठांतही निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 04:06 IST

व्यवस्थापन परिषद (मॅनेजमेंट कौन्सिल), विधिसभा (सिनेट) आणि विद्या परिषदेसह(अकॅडेमिक कौन्सिल) विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या

यदु जोशी / मुंबईव्यवस्थापन परिषद (मॅनेजमेंट कौन्सिल), विधिसभा (सिनेट) आणि विद्या परिषदेसह(अकॅडेमिक कौन्सिल) विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुका घेण्याची तरतूद असलेल्या नव्या विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यास आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील २१ सदस्यीय समितीच्या विधानभवनात झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात नवीन विद्यापीठ कायद्याचे विधेयक मंजुरीसाठी मांडले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. व्यवस्थापन परिषद, विधिसभा, विद्या परिषदेवर निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या मात्र कमी केली जाणार असून, कुलपतींच्या संमतीने कुलगुरुंना काही सदस्य नेमण्याचे अधिकार नवीन कायद्यात देण्यात आले आहेत. वर्षानुवर्षे बंद असलेल्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकांना हिरवा झेंडा दाखवून विद्यापीठांमध्ये राजकारण रंगण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. आतापर्यंत अधिष्ठाता हे अभ्यास मंडळांवर निवडून आलेल्या सदस्यांमधून निवडले जायचे. नवीन कायद्यांतर्गत ही पद्धत बंद करण्यात आली असून, यापुढे विद्यापीठांमध्ये सवेतन आणि पूर्ण वेळ अधिष्ठाता नेमण्यात येणार आहेत.१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी २) कॉमर्स अँड मॅनेजमेंट ३) इंटर डिसिप्लिनरी स्टडिज आणि ४) ह्युमॅनिटीज अशा चार फॅकल्टी म्हणजे विद्याशाखांचे अधिष्ठाता नेमण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यापीठात प्र-कुलगुरू नेमणे अनिवार्य असेल. त्यांची मुदत कुलगुरुंबरोबर संपेल. विद्यापीठांमध्ये काही नवीन बोर्ड निर्माण करण्यात येणार आहेत.त्यात इन्होवेशन अँड इनक्युबेशन बोर्ड, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी बोर्ड, युनिव्हर्सिटी नॅशनल अँड इंटरनॅशनल लिंकेजेस असे बोर्ड असतील. नवीन विद्यापीठ कायदा हा या आधीच्या १९९४ च्या कायद्याची जागा घेईल. विद्यापीठ कायदा कसा असावा, यासाठी डॉ. अरुण निगवेकर, डॉ. राम ताकवले, डॉ. अनिल काकोडकर अशा दिग्गजांच्या समित्यांनी या आधी अहवाल दिले. सनदी अधिकारी राहिलेल्या कुमुद बन्सल यांच्या समितीने अहवाल दिला. २०१४ मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या कायद्याचे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. त्यानंतर, विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. समितीच्या दहा बैठकीझाल्या. विविध घटकांची मते जाणून घेण्यात आली. असा दीर्घ प्रवास केल्यानंतर, आता अंतिम मसुद्यास मान्यता देण्यात आली असून, आगामी हिवाळी अधिवेशनात विधेयकाचे रूपांतर कायद्यात होईल, असा सरकारला विश्वास आहे.