शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच पालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार; सरकारचा निर्णय वैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 02:04 IST

याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

मुंबई : मुंबई महापालिकावगळता राज्यातील सर्व महापालिका व नगरपरिषदांसाठी बहुसदस्यीय प्रभाग प्रणाली पुन्हा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका हायकोर्टाने फेटाळल्याने पालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभागरचनेनुसारच  होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सरकारच्या निर्णयानुसार, महापालिकांमध्ये त्रिसदस्यीय, तर नगरपरिषदांमध्ये दोन सदस्यीय प्रभाग प्रणाली असणार आहे. म्हणजेच दोन सदस्यीय प्रभाग प्रणाली तयार करण्यासाठी जागांचे एकत्र सीमांकन केले जाईल. तसेच प्रभाग किंवा नगरसेवकांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही; केवळ निवडणुकीच्या उद्देशाने प्रभाग एकत्र केले जातील.

आयोगाकडूनही याचिकेला विरोधराज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी व राज्य निवडणूक आयोगानेही याचिकांना विरोध केला. न्या. ए. ए. सय्यद व न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठाने शुक्रवारी या याचिका फेटाळल्याचे  तोंडीच सांगितले. 

याचिकाकर्त्यांनी काय केला होता दावा?

  • पुण्याच्या परिवर्तन ट्रस्टच्या तन्मय कानिटकर व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी याचिका दाखल केली हाेती.
  • राज्य सरकारने तयार केलेला ३ सदस्यीय प्रभाग करण्याचा ठराव अमान्य करण्याचा अधिकार कायद्यानुसार राज्य निवडणूक आयोगाला आहे. 
  • कारण महाराष्ट्र महापालिका (सुधारित) कायदा १९९४ मधील कलम ५ (३) मध्ये करण्यात आलेल्या बदलानुसार ‘राज्य सरकार’ऐवजी ‘राज्य निवडणूक आयुक्त’ यांनाच महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग ठरवणे, प्रभागाच्या सीमा निश्चित करणे तसेच प्रत्येक प्रभागातील उमेदवारांची संख्या ठरविणे हे अधिकार मिळतात.
  • हा अन्वयार्थ न्यायालयाने मान्य केल्यास सगळे चित्र बदलू शकते, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.

प्रभाग रचनेचे अधिकार निवडणूक आयोगालाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागरचनेचे अधिकार राज्य सरकारला की राज्य निवडणूक आयोगाला या विषयावर आता पडदा पडला आहे. हे अधिकार आयोगालाच असल्याचे स्पष्ट झाले असून, आयोगाने कार्यवाहीदेखील सुरू केली आहे.     

मुंबईला का लागू नाही?केवळ सामूहिक प्रतिनिधित्वाच्या नावाखाली सध्याच्या सरकारचे राजकीय लाभ मिळवण्याचे उद्दिष्ट आहे आणि जर बहुसदस्यीय प्रभाग इतके प्रभावी असतील तर सरकार तोच निकष मुंबई महापालिकेला का लागू करीत नाही. 

टॅग्स :GovernmentसरकारHigh Courtउच्च न्यायालयElectionनिवडणूक