शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूकीपूर्वी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला ऊत

By admin | Updated: August 5, 2014 01:18 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात, अशी आशा प्रत्येक क्षेत्रातील कर्मचार्‍यांना लागली आहे.

खामगाव : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात, अशी आशा प्रत्येक क्षेत्रातील कर्मचार्‍यांना लागली आहे. त्यामुळे निवडणूकीपूर्वी सर्वच विभागातील कर्मचार्‍यांची आंदोलने सुरु केली आहेत. सद्या सुरु असलेला महसूल कर्मचार्‍यांचा संप आज ४ ऑगस्ट रोजी ४ थ्या दिवशीही सुरुच असुन आता तहसीलदारही संपात उतरणार आहेत. निवडणूकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होणार आहे. त्यानंतर कर्मचार्‍यांना आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी नवीन सरकारकडे जावे लागणार आहे. मात्र सद्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी होणार्‍या घोषणांच्या पावसात आपल्या मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी प्रत्येक विभागातील कर्मचारी संघटनांची आंदोलने होत आहेत. यापूर्वी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. त्यानंतर ग्रामसेवकांनी मागण्यांबाबत कामबंद आंदोलन पुकारुन ग्रामपंचायतच्या चाब्या पं.स.मध्ये जमा केल्या होत्या. त्यानंतर नगर परिषद कर्मचारी, सफाई कामगारांनी सुध्दा संप पुकारला होता. तर आता गेल्या १ ऑगस्टपासून महसूल कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद व आता महसूल विभागातील कामकाज प्रभावित झाले आहे. खामगावसह जिल्ह्यातील सर्वच उपविभागातील १00 टक्के कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले आहेत. कर्मचार्‍यांच्या मागण्या रास्त असल्या तरी या आंदोलनामुळे नागरिकांना मात्र त्रस्त व्हावे लागत आहे. त्यातच खामगाव तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांनीही आपल्या मागण्यांबाबत बेमुदत कामबंद आंदोलन १ ऑगस्टपासून सुरु केले आहे. हे आंदोलन सुध्दा आज ४ थ्या दिवशीही सुरुच होते. एकूणच या आंदोलनांमुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित होत आहे. (प्रतिनिधी)