शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक धमाका: झोपडीवासीयांना अडीच लाखांत घर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 06:21 IST

१० लाख कुटुंबांना फायदा मिळणार, २००० ते २०११ या १२ वर्षांसाठी निर्णय लागू करणारा आदेश जारी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या काळात अस्तित्वात असलेल्या झोपड्यांतील पात्र झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) अवघ्या अडीच लाखांत घरे देण्याचा आदेश गृहनिर्माण विभागाने गुरुवारी काढला. मुंबईतील सुमारे १० लाख झोपडीधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी या झोपडीधारकांना पुनर्वसित घरे सशुल्क देण्याचा निर्णय घेतला होता. गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यांनी गुरुवारी त्या निर्णयाची पूर्तता केली. १ जानेवारी २००० पूर्वीच्या पात्र झोपडीधारकांना पुनर्वसित घर मोफत देण्यात येत होते. तथापि, १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या कालावधीतील पात्र झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घर देताना ते सशुल्क द्यावे, असा निर्णय १६ मे २०१८ रोजी राज्य सरकारने घेतला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. 

मात्र हे शुल्क किती असावे, हे निश्चित करण्यासाठी गृहनिर्माण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली होती. या समितीने २.५० लाख रुपये इतके शुल्क निश्चित केले. राज्य मंत्रिमंडळानेही त्यास मान्यता दिली होती. त्यानुसार गुरुवारी आदेश काढण्यात आला.

 काय असतील निकष?१ जानेवारी २००२ ते १ जानेवारी २०११ या काळात संबंधित झोपडीत वास्तव्य असल्याचे पुरावे तपासून सशुल्क पुनर्वसनासाठी झोपडीधारकास पात्र ठरविले जाईल. त्यासाठीच्या अटी व शर्ती काय असतील, याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण; मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या मान्यतेने घेतील. या कालावधीतील झोपड्यांच्या जागेवर पुनर्वसन योजना आधी उभी झालेली असेल वा भविष्यात उभी राहणार असेल, अशा दोन्हीही परिस्थितीत २.५० लाख रुपये इतकेच शुल्क आकारले जाणार आहे.

राज्यात १० लाख कुटुंबांना घरे देणार-फडणवीससोलापूर : राज्य बेघरमुक्त करण्यासाठी वर्षभरात राज्य सरकारने दहा लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्या समाजासाठी घरांच्या योजना नाहीत, त्यांच्यासाठीही योजना आणण्यात येणार असून १० लाख कुटुंबांना पक्की घरे बांधून देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. अनुसूचित जाती, जमातींप्रमाणे ओबीसींसाठीही स्वतंत्र घरकूल योजना राबविण्याचे फडणवीस यांनी गेल्या अर्थसंकल्पात जाहीर केले होते. आता आणखी काही समाजघटकांसाठी ही योजना येण्याची शक्यता आहे.

झोपडीवासीयांची दिवाळी मुंबईतील झोपडीधारकांना अडीच लाखांत घर देण्याच्या या निर्णयाने १० ते १२ लाख कुटुंबांना हक्काचे घर मिळेेल. महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षे याबाबत झोपले होते. शिंदे-फडणवीस सरकारने गुरुवारी निर्णय घेतला. झोपडीवासीयांसाठी आजचा दिवस दिवाळीसारखा आहे.- आ. आशिष शेलार, अध्यक्ष, मुंबई भाजप. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस