शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक अर्थसंकल्पी अधिवेशनातच घ्या; राज्यपालांचे पत्राद्वारे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 00:44 IST

Instructions by letter to the Governor : राज्यपालांनी विधान मंडळ सचिवालयाला पाठविलेल्या या पत्रावर राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत चर्चा झाली. राज्यपाल असे निर्देश देऊ शकतात का? यावरही खल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई : नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधिमंडळाच्या १ मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनातच घेण्यात यावी, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत.राज्यपालांनी विधान मंडळ सचिवालयाला पाठविलेल्या या पत्रावर राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत चर्चा झाली. राज्यपाल असे निर्देश देऊ शकतात का? यावरही खल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्याचे संवैधानिक प्रमुख या नात्याने राज्यपालांनी हे पत्र पाठविले आहे. त्यांचे निर्देश राज्य सरकारसाठी बंधनकारक आहेत का? यावरही चर्चा झाल्याचे समजते.नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. विधानसभेचे अध्यक्षपद हे पुन्हा काँग्रेसलाच मिळणार, असे काँग्रेसचे नेते ठामपणे सांगत आहेत. अधिवेशन सुरू होण्यास आता केवळ ११ दिवसांचा अवधी आहे. एवढ्या अल्प काळात काँग्रेसचा उमेदवार ठरणे, त्याला अन्य दोन पक्षांनी सहमती दर्शवणे ही कसरत महाविकास आघाडी सरकारला करावी लागणार आहे. राज्यपालांनी दिलेल्या पत्रामुळे या अधिवेशनातच अध्यक्षांची निवड सरकारला करावी लागली तर त्यासाठीची बरीच राजकीय कसरत करावी लागू शकते.महाविकास आघाडी सरकारला विधानसभेत निर्विवाद बहुमत आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानाने होते. उद्धव ठाकरे सरकारने १६९ मते घेऊन विश्‍वासमत सिद्ध केले होते. सरकारी विमान वापरण्यावरून नुकताच राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात वाद झाला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी दिलेल्या या निर्देशांकडे पाहिले जात आहे. राज्यपालांनी हे पत्र पाठविले आहे. त्यांचे निर्देश राज्य सरकारसाठी बंधनकारक आहेत का? यावरही चर्चा झाल्याचे समजते.

सरकारची वाढविली चिंताकोरोनाच्या संकटामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर गुंडाळले गेले तर अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची गरज भासणार नाही. उपाध्यक्ष व तालिका अध्यक्षांच्या भरवशावर अधिवेशनाचे कामकाज रेटता येईल, असा एक तर्क दिला जात होता. मात्र राज्यपालांच्या पत्राने सरकारची चिंता वाढविली आहे.   

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी