शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Eknath Shinde: संतोष बांगर उद्धव ठाकरेंसोबत राहून काय करत होते? एकनाथ शिंदेंचा हिंगोलीतून मोठा गौप्यस्फोट

By विजय पाटील | Updated: August 8, 2022 23:02 IST

Eknath Shinde: संतोष बांगर हे माझे चेले आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडत होता. उलट ते आम्हाला बाहेर काहीही बोलत असल्याने लोकांना वेगळे वाटायचे. मात्र ते एकेक आमदार आमच्याकडे पाठवत होते.

 हिंगोली : राज्यात विविध विभागातील रिक्त जागांचा आढावा घेतला आहे. बेराेजगारांना काम मिळण्यासह प्रशासन गतिमान करण्यासाठी ८० हजार रिक्त जागा भरणार आहोत. यात पोलीस भरतीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री नऊच्या सुमारास हिंगोली येथील शिवसेनेच्या सभेत केले.

संतोष बांगर हे माझे चेले आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडत होता. उलट ते आम्हाला बाहेर काहीही बोलत असल्याने लोकांना वेगळे वाटायचे. मात्र ते एकेक आमदार आमच्याकडे पाठवत होते. त्यांनी योग्य वेळी आपले पत्ते उघडले. गरजेच्या वेळी ते आमच्या बाजूने उभे राहिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

यावेळी मंचावर माजी मंत्री संजय राठोड, आ. बालाजी कल्याणकर, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. विप्लव बाजोरिया, माजी खा. शिवाजी माने, माजी आ. रामराव वडकुते, राजेंद्र शिखरे, राजेश्वर पतंगे, सुभाष बांगर, फकिरा मुंडे, राम कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात आ. संतोष बांगर यांनी मराठा आरक्षण, शेळी-मेंढी विकास महामंडळाचे कळमनुरी येथेही कार्यालय, लमाणदेव मंदिर, आदिवासी भवनासाठी प्रत्येकी ५ कोटी, औंढा नागनाथसाठी ६० कोटींचा निधी देण्याची मागणी केली. मागील काही दिवसांपासून शिवसेनेची मंडळी टीका करीत असल्याने आमचा नाद करू नका. अंगावर आल्यास शिंगावर घेऊ, असा इशारा दिला. दगड मारा, गाडी फोडा जिल्हाप्रमुख करू, असे म्हणणाऱ्यांना महिनाभरापासून जिल्हाप्रमुख भेटत नाही. तुम्ही काय टक्कर देणार, असा सवाल केला.

यावेळी खा. हेमंत पाटील यांनीही माजी खासदार सुभाष वानखेडेंवर टीका करून महाराजांच्या वंशजाला राज्यसभा देत नसाल तर शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा तुम्हाला काय अधिकार, असा सवाल नाव न घेता उद्धव ठाकरे यांना केला. शिवसेनेने शिवसैनिकांना कायम लाचार बनवून ठेवल्याचा आरोपही केला . 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील महिनाभरापासून लोक नावे ठेवत आहेत. मात्र त्यांना कामातून चोख उत्तर देऊ. जनतेला महायुतीचे उमेदवार म्हणून मते मागितली. बाळासाहेबाच्या हिंदुत्वाच्या विचाराने मते मागितली. तो विचार पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत बसणेच योग्य आहे. यात चूक कोणाची? हे जनतेने पाहिले आहे. त्यामुळे जेथे जातोय, तेथे प्रसन्न मुद्रेने लोक स्वागत करीत असल्याचेही ते म्हणाले. आता डबल इंजीनचे सरकार आहे. केेंद्र भरभरून मदत करायला तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी तसे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले. तर अतिवृष्टीत झालेले नुकसान मी डोळ्यांनी पाहिले, यापूर्वी कधी झाली नसेल तेवढी मदत देऊ, असे जाहीरपणे सांगितले.

१० कोटींचा निधी जाहीरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळमनुरी येथील लमाण देव व आदिवासी भवनाला दहा कोटींचा निधीही जाहीर करून टाकला. तर औंढा नागनाथच्या विकासासाठी मंजूर झालेले ६० कोटी लवकरच मिळतील. विपश्यना केेंद्र, अन्नप्रक्रिया उद्योग याला चालना देऊ. बाळापूरला तालुकानिर्मितीबाबत सकारात्मक असून नासाची प्रयोगशाळा केंद्र शासनाकडे मुद्दा मांडून मार्गी लावू, असेही ते म्हणाले. तर ग्रामीण रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावून खेड्यापाड्यापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले. मराठा आरक्षण महायुतीच्या काळात दिले होते. नंतर हे प्रकरण आता न्यायालयात आहे. ते मिळण्यासाठी तज्ज्ञांची फौज उभी करू. मात्र तोपर्यंत मराठा समाजाला विविध फायदे देण्यात येत असल्याचेही शिंदे म्हणाले.

संतोष बांगर एकेक आमदार माझ्याकडे पाठवत होतेआ.संतोष बांगर हे माझे चेले आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडत होता. उलट ते आम्हाला बाहेर काहीही बोलत असल्याने लोकांना वेगळे वाटायचे. मात्र ते एकेक आमदार आमच्याकडे पाठवत होते. त्यांनी योग्य वेळी आपले पत्ते उघडले. गरजेच्या वेळी ते आमच्या बाजूने उभे राहिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाHingoliहिंगोली