शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2026: "आमिर खान यांनी 'तारे जमीन पर' केला; तसा आम्ही 'सारे जमीन पर' चित्रपट केला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 21:26 IST

Eknath Shinde Speech, Lokmat Maharashtrian of the Year awards 2026: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द ईयर २०२६च्या मंचावरून तुफान फटकेबाजी

Eknath Shinde Speech Devendra Fadnavis, Lokmat Maharashtrian of the Year awards 2026: महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चिला जाणारा बहुप्रतिक्षित लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२६ हा सोहळा मंगळवारी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ अभिनेते आमिर खान, विकी कौशल यांसह राज्यभरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावताना, आमचा 'सारे जमीन पर' चित्रपट विधानसभेच्या निवडणुकीत हिट झाला, असे मत व्यक्त केले.

चित्रपट 'सारे जमीन पर'...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत अनुभवी अभिनेते आमिर खान यांनी घेतली. याचा संदर्भ देताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. "अभिनेते आमिर खान यांचा 'तारे जमीन पर' हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. असाच एक चित्रपट आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी काढला, तो म्हणजे 'सारे जमीन पर'. याचाच अर्थ आम्ही त्यावेळी सर्व विरोधकांना जमिनीवर आणले. जसा आमिर खान यांचा 'तारे जमीन परट हिट झाला, तसाच आमचा 'सारे जमीन पर'देखील हिट झाला. त्यावेळी लोकमत आमच्या पाठीशी होतं. जनता आमच्या पाठीशी होती. मी एवढं नक्की सांगू शकतो की ज्याच्या पाठीशी असतं लोकमत, त्याची राजकारणात वाढते पत," असे उद्गार एकनाथ शिंदे यांनी काढले.

देवेंद्रजी तेल लावलेले पैलवान...

"एका बाजूला राजकारणातील तळपता तारा आणि दुसऱ्या बाजूला चित्रपट क्षेत्रातील शुक्रतारा असे दोन तारे एकत्र आज आले. देवेंद्रजी हे तेल लावलेले पैलवान आहेत. ते कुणाच्याही पकडीमध्ये येत नाहीत. आमिर खान यांनी कुस्तीवर आधारित दंगल हा चित्रपट केलेला असला, तरीही आमच्या देवेंद्रजींना धोबीपछाड कधीही देऊ शकत नाही असा आम्हाला विश्वास आहे," असे शिंदे म्हणाले.

अशोकमांमांना पुरस्कार मिळत राहोत...

"ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माझी लोकमत समूहाला विनंती आहे की, त्यांना पुरस्कारासोबतच एक शोकेस देखील भेट द्यावी. जेणेकरून त्यांनी आयुष्यभर कमावलेले पुरस्कार ठेवण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होईल. अशोक सराफ यांनी चित्रपट आणि नाटकांमधून आम्हा रसिकांना जो आनंद दिला आहे, त्याची परतफेड करणे शक्य नाही. त्यांचे योगदान प्रचंड मोठे आहे. त्यामुळे आपण त्यांना कितीही पुरस्कार दिले, तरीही त्याची बरोबरी करता येणार नाही हे सत्य आहे. अशोकमामांना यापुढेही अशाच प्रकारे पुरस्कार मिळत राहोत अशी सदिच्छा मी व्यक्त करतो," अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.

पुरस्कारातून प्रेरणा हीच भावना

"महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सोहळ्यासाठी ज्यूरी म्हणून काम करणे हा एक मोठा पुरस्कार आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन दिले जाते. अशा व्यक्तींना पुरस्कार देऊन आणखी प्रेरणा देणे हीच यामागची भावना आहे. या उपक्रमासाठी लोकमत समूहाचे अभिनंदन आणि आभार", असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Compares Political Win to 'Taare Zameen Par' at Lokmat Awards

Web Summary : At the Lokmat Maharashtrian of the Year awards, Eknath Shinde likened their political victory to the film 'Taare Zameen Par,' stating they brought opponents 'to the ground.' He praised Devendra Fadnavis and lauded Ashok Saraf's contributions, advocating for continued recognition of achievers.
टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026LokmatलोकमतEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस