शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

कठीण असला तरी शिवसेनेसाठी निर्णय घ्यावा; खासदार भावना गवळींचं उद्धव ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 17:41 IST

शिवसेनेकरिता निर्णय घ्यावा हीच सेवेशी पुनश्च नम्र विनंती असल्याचं भावना गवळी यांनी पत्रात म्हटलं आहे

मुंबई - शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांसह आता काही खासदारांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेतली आहे. याबाबत शिवसेना खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून कठीण असला तरी शिवसैनिकांसाठी निर्णय घ्या अशी साद घातली आहे. 

याबाबत भावना गवळी(Bhavana Gawali) यांनी पत्रात काय म्हटलंय की, आपल्या सेवेशी नम्रपणे निवेदन करते, सद्यास्थितीत निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे आपण व्यतीथ झाला आहात. पक्षापुढे अचानकपणे आलेल्या संकटामुळे आपणासमोर खूप मोठे आव्हान असल्याची कल्पना मला आहे. एक शिवसैनिक म्हणून माझ्या मनातही याची खंत आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्याकरिता विनंती करत आहोत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमत: हाडामासाचे शिवसैनिकच आहेत. त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कठोर कार्यवाही न करता कठीण असला तरी शिवसेनेकरिता निर्णय घ्यावा हीच सेवेशी पुनश्च नम्र विनंती असल्याचं भावना गवळी यांनी पत्रात म्हटलं आहे. 

काय आहे प्रकरण?विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात क्रॉस व्होटिंग झाल्याचं समोर येताच एकनाथ शिंदे आणि काही आमदार नॉट रिचेबल झाल्याचं कळालं. त्यानंतर शिंदे हे समर्थक आमदारांसह गुजरातच्या सूरत येथील हॉटेलमध्ये असल्याचं आढळलं. त्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा सत्तासंघर्षाचं नाट्य सुरू झालं. भाजपासोबत सरकार स्थापन करावं, काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडा असा प्रस्ताव शिंदे आणि समर्थक आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठवला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या आमदारांनी शिवसेनेतच बंड पुकारलं त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसला. या सर्व घडामोडीत भाजपाकडून एकनाथ शिंदे आणि आमदारांना रसद पुरवली जात असल्याचंही समोर आले. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचा मोठा गट असल्याचा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आमदारांना पत्राद्वारे व्हीप पाठवून बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे