शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अपात्रतेचा निकाल येण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी पुढचा गिअर टाकला; संपर्क नेते, लोकसभा निरीक्षक नियुक्त्या जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 15:02 IST

शिंदे यांनी शिवसेनेचे राज्यातील संपर्क नेते आणि लोकसभा निरीक्षक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. 

डिसेंबर महिन्याअखेरीस विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्र प्रकरणावर निकाल येणार आहे. यामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुढचा गिअर टाकला आहे. शिंदे यांनी शिवसेनेचे राज्यातील संपर्क नेते आणि लोकसभा निरीक्षक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. 

शिंदे यांनी कोकण पट्टा, पश्चिम महाराष्ट्र वगळून उर्वरित ११ क्षेत्रांसाठी लोकसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यानुसार राजेश पाटील -नंदुरबार, प्रसाद ढोमसे - धुळे, सुनील चौधरी - जळगाव, विजय देशमुख - रावेर, अशोक शिंदे - बुलढाणा, भूपेंद्र कवळी - अकोला, मनोज हिरवे - अमरावती, परमेश्वर कदम - वर्धा, अरुण जगताप - रामटेक, अनिल पडवळ - नागपूर, आशिष देसाई - भंडारा-गोंदिया यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

तर पश्चिम महाराष्ट्र सोडून कोकण पट्ट्यासह उर्वरित महाराष्ट्रासाठी विभागीय संपर्क नेत्यांचीही निय़ुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभाग रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यांसाठी उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  कोकण विभाग ठाणे, पालघरसाठी नरेश म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई विभाग मुंबई शहर, मुंबई उपनगरसाठी सिद्धेश कदम, किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

तर मराठवाडा विभाग नांदेड, लातूर, हिंगोली, धाराशिवसाठी आनंदराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाडा विभाग जालना, संभाजीनगर, परभणी, बीडसाठी अर्जुन खोतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र विभाग नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर जिल्ह्यांसाठी भाऊसाहेब चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना