शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: आदित्य ठाकरेंच्या त्या दाव्याला एकनाथ शिंदेंचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 15:18 IST

Eknath Shinde's reply to Aditya Thackeray: भाजपासोबत न गेल्यास केंद्रीय यंत्रणा पकडून नेतील असं म्हणत एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन ढसाढसा रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्याला आता शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड होऊन शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून एकनाथ शिंदे आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी रंगत आहेत. दरम्यान, काल आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना नवा दावा केला होता. भाजपासोबत न गेल्यास केंद्रीय यंत्रणा पकडून नेतील असं म्हणत एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन ढसाढसा रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावरून नव्या चर्चेला उधाण आले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी एका वाक्यात आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे ४० लोक हे स्वत:च्या जागा आणि पैशांसाठी भाजपासोबत गेले आहेत. अन्य कुठलेही कारण त्यांच्याकडे नव्हते. भाजपासोबत न गेल्यास केंद्रीय तपास यंत्रणा आपल्याला अटक करतील, उचलून नेतील म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन ढसाढसा रडले होते, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दाव्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे हे बालिश आहेत, असं प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे कष्टकरी, शेतकरी यांचे अश्रू पुसणारे आहेत.घरात मासा मेला म्हणून दारे बंद करून रडणारे नाहीत. आम्ही रडणारे नसून रडवणारे आहोत, अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तेव्हा सगळ्या नेत्यांना बाजूला ठेऊन पंतप्रधान मोदींची वेगळी भेट उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तेव्हा ते रडत होते कारण नोटीस यांना आली होती. त्यावेळी नरेंद्र मोदींकडे ही मंडळी गयावया करत होती. आम्हाला कशाला नोटीस येईल? आपली, आपल्या नातेवाईकांची, मित्रांची परदेशात कुठे कुठे कंपन्या आहेत त्याचा सगळा चिठ्ठा आमच्याकडे आहे, त्या उघड कराव्या लागतील असा इशारा म्हस्के यांनी दिला आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना