शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde Cabinet Expansion: मंत्रिपदावर शहाजी बापूंनी गुवाहाटीची आठवण करून दिली; एकनाथ शिंदेंना म्हणालो होतो... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 10:02 IST

Eknath Shinde Cabinet Expansion Shahaji Bapu Patil: सह्याद्री अतिथीगृहावर जाताना शहाजी बापूंना मंत्रिपदाबाबत विचारण्यात आले. यावेळी त्यांनी आमदारांना गुवाहाटीची आठवण करून दिली. 

शिंदे गटातून काही नावे ठरत नसल्याने सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे समर्थक आमदारांची बैठक बोलविण्यात आली आहे. असे असताना अपक्ष आमदार बच्चू कडूंनी मंत्रिपद घेणारच असे वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यातच आता शिंदेंच्या बंडावेळी चर्चेत आलेल्या शहाजी बापू पाटलांनी मोठे वक्तव्य केले आहे. 

Eknath Shinde Cabinet Expansion: एकनाथ शिंदेंच्या गटातील मंत्र्यांची नावे ठरेनात; या चार नावांवर 'वाद' सुरुकाय झाडी, काय डोंगर, काय हाटेल, एकदम ओक्केच... या डायलॉगमुळे शहाजी बापू प्रसिद्धीच्या झोतात आले होते. सह्याद्री अतिथीगृहावर जाताना शहाजी बापूंना मंत्रिपदाबाबत विचारण्यात आले. यावेळी त्यांनी आमदारांना गुवाहाटीची आठवण करून दिली. 

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या जुन्या नेत्यांना मंत्रिपदे देतायत, हे चांगले आहे. गुवाहाटीला जेव्हा आम्ही गेलो होतो, तेव्हा एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असा शब्द त्यांना आम्ही सर्व आमदारांनी दिला होता. तसे अधिकार त्यांना दिले होते. यामुळे मंत्रिपद वाटपाचा अधिकारही त्यांना आहे. शिंदे जो निर्णय घेतील, ज्याला मंत्रिपद देतील ते आम्हाला मान्य असल्याचे शहाजी बापू पाटलांनी सांगितले. 

 दरम्यान, शिंदे गटातील 50 आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.  भाजपाचे ९ आणि शिंदे गटाचे सहा आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती रात्री उशिरा समोर आली होती. परंतू, शिंदे गटात अस्वस्थता असल्याने शिंदे गटाचे ९ जण शपथ घेण्याची शक्यता आहे. परंतू, अद्याप शिंदे गटात मंत्रिपद कोणाला मिळणार याची यादी निश्चित झालेली नाही. यामुळे शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहावर सर्व आमदारांना एकत्र येण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार