मुंबई : भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) महाराष्ट्र केडर मिळालेल्या आठ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची प्रक्षिणासाठी राज्यातील विविध पोलीस घटकांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक पोलीस अधीक्षक/उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांना सहा महिने १८ दिवस प्रशिक्षण घ्यावयाचे आहे. प्रियंका मीना यांची रायगड जिल्ह्यात पोस्टिंग करण्यात आली आहे. सर्वांच्या नियुक्तीचे आदेश नुकतेच गृहविभागाकडून काढण्यात आले आहेत.आयपीएसच्या ६८ व्या तुकडीतील ८ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र केडर मिळाले आहे. त्यापैकी संदीप घुगे यांची रायगडला, तर भाग्यश्री नवटके व अतुल कुलकर्णी यांची अनुक्रमे कोल्हापूर व सोलापूर ग्रामीणला नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय प्रियंका मीना (रायगड), नुरल हसन (बीड), रगासुधा आर (सातारा), मनीष कलवानिया (जळगाव), जी विजया कृष्णा यादव (अमरावती ग्रामीण) साडेसहा महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
राज्यात आठ आयपीएस अधिकाऱ्यांना नियुक्ती
By admin | Updated: January 16, 2017 06:06 IST