शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ स्थानकावर दररोज आठ तासांचा मेगाब्लॉक : अमरावती-मुंबई एक्स्प्रेस १५ दिवस रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 19:33 IST

भुसावळ रेल्वे स्थानकावर विविध कामे पूर्ण करण्यासाठी दररोज तब्बल सहा ते आठ तासांचा मेगाब्लॉक राहील.

-  गणेश वासनिकअमरावती -  भुसावळ रेल्वे स्थानकावर विविध कामे पूर्ण करण्यासाठी दररोज तब्बल सहा ते आठ तासांचा मेगाब्लॉक राहील. त्यामुळे नागपूरहून बडनेरामार्गे भुसावळकडे ये-जा करणा-या बहुतांश रेल्वे गाड्या ५ एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यात अमरावती-मुंबई, अमरावती-सुरत, अमरावती-पुणे (वातानुकूलित), भुसावळ-गोंडवाना आदी प्रमुख रेल्वेगाड्यांचा समावेश आहे.उन्हाळ्यातील सुट्यांमध्ये लग्नप्रसंग, सहलीकरिता बाहेरगावी जाण्याचे बेत आखले जात असतानाच रेल्वे विभागाने गुरुवारी रद्द होणाºया गाड्यांची यादी जाहीर केली. भुसावळ रेल्वे स्थानकाहून नागपूर, मुंबई, हावडा, अलाहाबादमार्गे ये-जा करणाºया या गाड्या ५ ते २० एप्रिल दरम्यान रद्द केल्या आहेत. भुसावळ रेल्वे स्थानकावरील यार्डचे नूतनीकरण, नवीन प्लॅटफार्म आणि तिसरा लोहमार्ग निर्मितीचे कार्य हाती घेतल्याने दरदिवशी आठ तासांचा मेगाब्लॉक राहील.  अंबा एक्स्प्रेसला फटका रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीत पश्चिम विदर्भातील प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेस (१२११२), अमरावती-सुरत एक्स्प्रेस (१९०२६), अमरावती-पुणे (वातानुकूलित) एक्स्प्रेस (२२११८), भुसावळ-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस (१२४०५), हावडा-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस (२२१२१), पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस (१२८४३), हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस (१२८३३) या गाड्यांचा समावेश आहे. भुसावळ रेल्वे स्थानकाहून जाणाºया हॉलिडे स्पेशल सहा गाड्यांच्या फेºया २० एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.  पॅसेंजर गाड्यादेखील रद्दभुसावळ-नागपूर, अमरावती-भुसावळ, नरखेड-भुसावळ, वर्धा-भुसावळ, मुंबई-भुसावळसह मुंबई-भुसावळ-नागपूर दरम्यान धावणाºया जवळपास ३६ पॅसेंजर गाड्यांच्या फेºया रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गरीब, सामान्य प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे.  भुसावळ रेल्वे स्थानकावर विविध कामांसाठी तब्बल १५ दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे अमरावतीहून भुसावळ मार्गे जाणाºया सर्वच गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात अमरावती-मुंबई एक्स्प्रेसचा समावेश आहे. रेल्वे विभागाने रद्द होणाºया गाड्यांची यादी जाहीर केली आहे.      - शरद सयाम, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक, बडनेरा

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAmravatiअमरावती