शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

आठ तासांचा प्रवास तीन तासांत

By admin | Updated: December 14, 2015 01:53 IST

मुंबईहून अहमदाबादला जात आहात का? मग बुलेट ट्रेनने अवघ्या ३ तासांत प्रवास पूर्ण करा, अशा गप्पा ८ वर्षांनंतर प्रवाशांमध्ये रंगतील.

मुंबई : मुंबईहून अहमदाबादला जात आहात का? मग बुलेट ट्रेनने अवघ्या ३ तासांत प्रवास पूर्ण करा, अशा गप्पा ८ वर्षांनंतर प्रवाशांमध्ये रंगतील. मुंबई - अहमदाबाददरम्यानचा प्रवास वेगवान करण्यासाठी भारत व जपानमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचा करार शनिवारी झाला. या करारामुळे दोन्ही शहरांमधील अंतर कमी होईल. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशनने (जायका) मागील दोन वर्षांत अभ्यास पूर्ण केला असून, जुलै महिन्यात अहवालही सादर केला आहे. मुंबईहून अहमदाबाद आणि त्यापुढे जाण्यासाठी दररोज २५ पेक्षा जास्त ट्रेन उपलब्ध आहेत. यात एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन आणि एसी डबल डेकर ट्रेनचाही समावेश आहे. मुंबई ते अहमबाद प्रवासाला आठ तास लागतात. या दोन्ही शहरांदरम्यान दररोज व्यापारी तसेच व्यावसायिकांसह अनेक प्रवाशांची ये - जा असते. एकूणच व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून बुलेट ट्रेन चालविण्याचा हा पर्याय समोर आला. साधारण २00९-२0१0 साली रेल्वे अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल सादर झाला होता. मात्र प्रत्यक्षात प्रकल्पाला गती मिळण्यास फारच उशीर झाला. या प्रकल्पाचा जपान इंटरनॅशनल एजन्सीकडून मागील दोन वर्षांत अभ्यास करण्यात आला असून, त्याचा अहवाल जुलै महिन्यात रेल्वेला सादर करण्यात आला. मुंबई-अहमदाबाद-पुणे असा ६५0 किलोमीटरचा प्रकल्प सुरुवातीला रेल्वेसमोर ठेवण्यात आला. मात्र पुण्यातून बुलेट ट्रेन नेताना घाटमाथ्याचा अडथळा पाहता पुणे शहराला सध्या सायडिंगला ठेवण्याचा विचार करण्यात आल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. ही बुलेट ट्रेन पुणेमार्गे घाट आणि चढउतार असून, त्यामुळे सुरक्षेचा आणि अन्य प्रश्न उद्भवू शकतात. त्यामुळेच बुलेट ट्रेनच्या प्रकल्पातून पुण्याला बाजूला ठेवण्याचा विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले. मुंबईतून बुलेट ट्रेनची सुरुवात करायची असल्यास त्यासाठी जागेचा शोधही सुरू आहे. अधिक मोकळी जागा हवी असल्याने प्रथम पसंती वांद्र्यातील बीकेसीला देण्यात आली आहे. मात्र यातही काही तांत्रिक अडथळे समोर आल्याने ते सोडविण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जात आहे. (प्रतिनिधी)>> या प्रकल्पाची किंमत सुरुवातीला ६५ हजार कोटी एवढी ठरविण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात प्रकल्पाला होत असलेला उशीर आणि वाढणारा खर्च पाहता आता त्याची किंमत ९८ हजार कोटी एवढी झाली आहे. यात जवळपास ३३ हजार कोटींची भर पडली आहे.>> ११ स्थानकांवरही थांबे अशक्यमुंबई ते अहमदाबादपर्यंत बुलेट ट्रेनला तीन तासांत अंतर कापायचे असल्याने ११ स्थानकांवर थांबे देणेही अशक्य असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. त्याचीही पडताळणी केली जात आहे. या प्रकल्पासाठी मुंबईतून बुलेट ट्रेन सोडण्यासाठी सुरुवातीची जागा आणि आगार शोधण्यात येत आहे. त्यासाठी बीकेसीचे नाव पुढे होते. मात्र आता मुंबई सेन्ट्रलही किंवा एलटीटीचा पर्याय ठेवण्यात येत आहे. पुण्यातून ही ट्रेन जाताना डोंगरमाथ्याचा अडथळा असल्याने सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे पुण्याचा विचार सध्या करण्यात आलेला नाही. काही जागांचा शोध सुरू असून, तांत्रिक समस्याही सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. - शरत चंद्रायन, पश्चिम रेल्वे, मुख्य जनसंपर्क अधिकारी