शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता न केल्यास मंत्रालयात घुसू, अंगणवाडी सेविका आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 17:20 IST

आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता न केल्यास मंत्रालयात घुसू, असा इशारा आज आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर अंगणवाडी सेविकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मुंबई, दि. 27 - आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता न केल्यास मंत्रालयात घुसू, असा इशारा आज आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर अंगणवाडी सेविकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अंगणवाडीसेविकांचं पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी सध्या मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. या अंगणवाडी सेविकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे आले असता अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनीही सरकारवर जोरदार टीका केली.ज्या मातांचे आशीर्वाद घ्यायला पाहिजे, त्या मातांचे सरकारला शाप लागल्याशिवाय राहणार नाही, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मी इथे नेतृत्त्व करायला नाही, तर नेतृत्वाला ताकद द्यायला आलो आहे. तुम्ही आई बनून कुपोषित बालकांचं पालन पोषण करता. ज्या मातांचे आशीर्वाद घ्यायला पाहिजे, त्या मातांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाही. खचून जाऊ नका, सरकारला नमवण्याची ताकद तुमच्यात आहे. अंगणवाडीसेविका ज्या दिशा ठरवतील त्यामध्ये शिवसेना सहभागी असेल, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. आमची मनं अजून जिवंत आहेत. मुर्दाड मनाने आम्ही कारभार करू शकत नाही. मुख्यमंत्रीसाहेब इकडे प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका, इकडे लाडू द्या नाहीतर चिक्की द्या. लोकशाहीच्या नावाने जर तुम्ही ठोकशाही करणार असाल, तर हे मी चालू देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.मी नेतृत्व करायला नाही तर नेतृत्वाला ताकद द्यायला आलो. माता भगिनींची झोप उडवून तुम्ही तुमची स्वप्न साकारायला दौरे करतातवेडा झालेला विकास राज्याला आणि देशाला परवडेल का, निवडणूक आल्यानंतर तुम्हाला शिवरायाची आठवण येते. त्या शिवाजी महाराज्यांच्या या माता भगिनींचे शाप तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही, ही लोकशाहीच्या मार्गाने ठोकशाही चालली असेल तर ती आम्ही मोडून काढू, तुमची ताकत सरकारला नमवू शकते, इतिहासाची पुनरावृत्ती घडवायची इच्छा त्यांची असेल तर ती पुनरावृत्ती घडवायची तयारी माझी आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हजेरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी केली.