शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

कॉल सेंटरप्रकरणी आठ आरोपींना न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: October 18, 2016 21:03 IST

मीरा रोड येथील कॉल सेंटरप्रकरणी ५ आॅक्टोबर पासून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी आतापर्यत ७४ जणांना अटक करून एक कोटीपेक्षा

- जितेंद्र कालेकर/ऑनलाइन लोकमतठाणे, दि.18 - मीरा रोड येथील कॉल सेंटरप्रकरणी ५ आॅक्टोबर पासून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी आतापर्यत ७४ जणांना अटक करून एक कोटीपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनीही ठाणे पोलिसांकडून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर आठ आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.कंपनी अ‍ॅक्टप्रमाणे कोणत्याही कॉल सेंटरची नोंदणी न करता सागर ठक्कर उर्फ शॅगी याने त्याच्या काही साथीदारांसह मीरा रोड भागात हे कॉल सेंटर सुरु केले होते. तिथून अनेक अमेरिकन नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे कॉल करुन आयआरएस (अमेरिकन इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसेस) चे अधिकारी असल्याची बतावणी केली जात होती. त्याद्वारे त्यांनी अनेकांची करोडो रुपयांची फसवणूक केली. युनिव्हर्सल आऊट सोर्सेस सर्व्हिसेस या कॉल सेंटरमधून हैदरअली मन्सूरी, तपेश गुप्ता आणि अर्जून वासूदेव हे संचालक तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने परदेशी नागरिकांकडून खंडणी आणि फसवणुकीने पैसे उकळण्याचा ‘उद्योग’ करीत होते.

जगदीश कनानीही मास्टरमार्इंड !१६ आॅक्टोबर रोजी याप्रकरणी अटक केलेल्या जगदीश कनानी याचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने कॉलसेंटरमध्ये अनेकांना प्रशिक्षण दिले आहे. त्याचे आणि शॅगीचे जवळचे संबंध असल्याचेही उघड झाले आहे. तोही यातील एक मास्टरमार्इंड आहे. धु्रवेन आणि ब्रिजेश यांनी अहमदाबाद येथून त्याला हवालामार्फत पैसे दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याचा अलिशान फ्लॅट, महागड्या गाड्यांची खरेदी त्याने कशाप्रकारे आणि कोणत्या पैशांतून केली, याचीही चौकशी आता ठाणे पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, जगदीश हा निष्पाप असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केला आहे.दरम्यान, हैदरअली याच्याविरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यात ५ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यासह १८ जणांना अटक केली होती. तर काशीमीरा पोलीस ठाण्यात अर्जुन वासूदेव या संचालकासह ५६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक झाली. हैदरअलीला काशीमीरा प्रकरणातही वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाने पुन्हा अटक केली आहे. तर अर्जुन वासूदेव याला नयानगरच्या प्रकरणात ताबा मिळण्याची मागणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींदद्र दौंडकर यांनी न्यायालयात केली आहे. दरम्यान नवोझ गुप्ता, नासीर घोरी, धर्मेश सोनी,अर्जून वासूदेव, अविनाश मास्टर, गोविंद ठाकूर आणि जॉन्सर डॉन्टीस या आठ जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.हवालाचे पैसे घेण्याचे काम परदेशी नागरिकांची फसवणूक झाल्यानंतर भीतीपोटी ते कॉल सेंटरमधून आलेल्या सूचनांप्रमाणे गिफ्ट कार्ड विकत घ्यायचे. त्याचे पैसे हवालाद्वारे स्विकारण्याचे काम हैदरअली करीत होता, अशी माहिती तपासात उघड झाल्याचे एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.