शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Eid-ul-fitr 2021: शुक्रवारी साजरी होणार रमजान ईद; चंद्रदर्शन घडलं नसल्यानं धर्मगुरूंचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 23:01 IST

Eid-ul-fitr 2021: नाशिक विभागीय चांद समितीकडून घोषणा

नाशिक: इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईदवर (ईद-उल-फित्र) येत्या शुक्रवारी (दि.14) शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने शासनाच्या आदेशानुसार साजरी करण्यात येणार असल्याची घोषणा शहर-ए-खतीब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या धर्मगुरूंच्या विभागीय बैठकीत बुधवारी संध्याकाळी करण्यात आली.

मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे ईदवर सावट आहे. यामुळे यावर्षीही शहरातील शहाजहाँनी ईदगाह मैदानावर सामुदायिकरित्या नमाजपठणाचा सोहळा होणार नसल्याचे खतीब यांनी बोलताना स्पष्ट केले. यामुळे ईदगाह यंदाही सुने-सुने राहणार आहे. समाजबांधवांनी आपापल्या घरात ईदचे नमाजपठण करावे असे आवाहन सर्व धर्मगुरूंनी केले आहे.

रमजान ईद, बकरी ईद हे दोन प्रमुख सण मुस्लीम बांधवांचे सर्वात मोठे सण म्हणून ओळखले जातात. या सणाच्या दिवशी धार्मिक परंपरेनुसार नमाजपठण केले जाते.  'शिरखुर्मा' हे रमजान ईदचे विशेष आकर्षण असते. हे खाद्यपदार्थ दुधापासून तयार केलेले सुकामेव्याचे द्रवरूप मिश्रण असते. 

गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी कोरोनाची साथ तेजीत असून संसर्ग शहरासह ग्रामिण भागातसुद्धा अधिक फैलावत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहे. सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सोहळे रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे. महिनाभरापासून सर्व धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद करण्यात आले आहेत. येत्या बुधवारपासून नाशिकमध्ये कडक लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. यामुळे यंदा समाजबांधवांना ईदची नमाज आपापल्या घरांमध्येच पठण करावी लागणार असल्याचे दिसते. कोरोनाचे संकट बघता समाजबांधवांनी यावर्षीही ईद ची खरेदी पुढे ढकलली आहे. बाजारपेठा बंद असल्याने अनावश्यक खर्चाला फाटा देत गरजूंसाठी राबणाऱ्या विविध संस्थांचे हात बळकट करण्यासाठी समाजबांधव प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. महिनाभरापासून कोरोनाची तीव्र झालेली साथ, रोजगाराचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेता 'जकात', 'फित्रा'च्या माध्यमातून समाजातील धनिक वर्ग गोरगरीब कुटुंबांपर्यंत आर्थिक स्वरूपात दान तसेच धान्यदान पोहच करण्याचा प्रयत्न करत आहेत. बहुतांश सामाजिक सेवाभावी संस्थांनी अशा कुटुंबांचा शोध घेत 'रमजान किट' अर्थात शिरखुर्मासाठी लागणारा सुकामेवा, किराणा वस्तू पुरविण्यास सुरुवात केली आहे.