शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला शिक्षा

By admin | Updated: September 8, 2016 20:18 IST

मुलीचा विनयभंग करुन तिला परिक्षेत नापास करण्याची धमकी देणारा शिक्षक विजय कौतीकराव बावस्कर याला सत्र न्याय दंडाधिकारी ए.वाय.एच. मोहम्मद यांनी तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि.  8 - सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिला परिक्षेत नापास करण्याची धमकी देणारा शिक्षक विजय कौतीकराव बावस्कर याला सत्र न्याय दंडाधिकारी ए.वाय.एच. मोहम्मद यांनी तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला एका महिना कारावास भोगावा लागेल. तसेच दंडाची रक्कम पिडीतेस नुकसान भरपाई म्हणुन देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने तक्रार दिली की, सदर मुलगी एन-११, हडको येथील एका शाळेत ६ वीच्या वर्गात शिकत होती. त्या शाळेत आरोपी विजय बावस्कर हा सहाय्यक शिक्षक म्हणुन इतिहास, भूगोल व नागरिक शास्त्राचा विषय शिकवत होता. ४ जानेवारी २०१२ रोजी सकाळी सदर मुलगी ही शाळेत गेली होती.९ ते १० वाजेच्या सुमारास पिडीतेच्या वर्गावर आरोपी बावस्कर याचा तास होता. तेंव्हा बावस्कर याने पिडीत मुली जवळ जावुन तीच्या सोबत वर्गातील सर्व विद्यार्थ्यां समोर अश्लील वर्तन करुन तीची छेड काढली. त्यामुळे ती मुलगी घाबरुन बाजुला झाली. त्यावेळी बावस्करने मुलीला या घटनेची वाच्यता कोणाकडे केल्यास परिक्षेत नापास करण्याची धमकी दिली. पिडीत मुलगी भयभीत होऊन घरी गेली असता तीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. ५ जानेवारी २०१२ रोजी पिडीतेच्या आईने सिडको पोलिस ठाण्यात शिक्षक बावस्कर विरुध्द तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी तत्कालीन पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी पिडीत मुलीसह इतर विद्यार्थ्यांचा जबाब नोंदविला. १ जानेवारी २०१२ रोजी बावस्करला अटक केली. तपास करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सहाय्यक सरकारी वकील एन. एन. पवार यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने शिक्षक बावस्कर याला विनयभंगाच्या आरोपाखाली भा.दं.वि. कलम ३५४ अन्वये वरीलप्रमाणे शिक्षा आणि दंड ठोठावला. तसेच दंडाची रक्कम पिडीतेस नुकसान भरपाई म्हणुन देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.