शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

मुस्लिमांनी उभारलेल्या ‘इको-फ्रेण्डली’ ताबुताचे हिंदू होणार खांदेकरी अन् घडणार जातीय सलोख्याचे दर्शन

By azhar.sheikh | Updated: September 28, 2017 23:21 IST

नाशिक शहरातील जुने नाशिक या गावठाण भागातील सारडा सर्कल येथे शेकडो वर्षे जुनी हजरत सय्यद इमामशहा बाबा यांची दर्गा आहे. या दर्ग्याच्या प्रांगणात मुहर्रमच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये एक आगळा उत्सव दरवर्षी बघावयास मिळतो. हिंंदू-मुस्लीम भाविक ‘मुहर्रम’ या उर्दू महिन्याच्या आठ, नऊ व दहा तारखेला या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ हजेरी लावून ताबुतापुढे प्रार्थना करतात.

ठळक मुद्देपारंपरिक प्रथेतून आजही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन शेकडो वर्षे जुनी हजरत सय्यद इमामशहा बाबा यांची दर्गा मुहर्रमला हिंदू कोळी बांधव या ताबुताचे खांदेकरी होतात मुहर्रमचा उत्सव अन् त्याची परंपरा राष्ट्रीय  एकात्मतेचे प्रतीक

आॅनलाइन लोकमत, नाशिक -धार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा ही जुळलेली असतेच अन् अशा परंपराच त्यांचे वैशिष्ट्य ठरतात, पारंपरिक प्रथांमधून आजही भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते. नाशिकच्या ‘इमामशाही’ दर्गा परिसरात दरवर्षी होणारा मुहर्रमचा उत्सव अन् त्याची परंपरा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानली जाते. येथे अळीवच्या बियांपासून मुस्लीम कुटुंबीय हिरवळीचा ताबूत तयार करतात अन् आशुरा’च्या दिनी अर्थात मुहर्रमला हिंदू कोळी बांधव या ताबुताचे खांदेकरी होतात, यावेळी जातीधर्माच्या सर्व भिंती भेदल्या जातात अन् जातीय सलोख्याचे दर्शन घडते.नाशिक शहरातील जुने नाशिक या गावठाण भागातील सारडा सर्कल येथे शेकडो वर्षे जुनी हजरत सय्यद इमामशहा बाबा यांची दर्गा आहे. या दर्ग्याच्या प्रांगणात मुहर्रमच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये एक आगळा उत्सव दरवर्षी बघावयास मिळतो. हिंंदू-मुस्लीम भाविक ‘मुहर्रम’ या उर्दू महिन्याच्या आठ, नऊ व दहा तारखेला या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ हजेरी लावून ताबुतापुढे प्रार्थना करतात. या तीन दिवसांमध्ये येथे यात्रोत्सव भरविला जातो.

या यात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे अळीवच्या बियांपासून तयार झालेला व हिरवळीने नटलेला आकर्षक ताबूत. हा ताबूत वर्षानुवर्षांपासून येथील सय्यद कुटुंबीय तयार करत आले आहे अन् या ताबुताचे मानकरी म्हणून खांदेकरीच्या भूमिकेत हिंदू कोळी बांधव राहिले आहेत. या शेकडो वर्षे जुन्या पारंपरिक प्रथेतून आजही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. यावर्षी येत्या शनिवार व रविवार इमामशाही दर्गाच्या परिसरात यात्रा भरणार आहे. रविवारी (दि.१) मुहर्रमचा दहावा दिवस असून, ‘आशुरा’चा दिन म्हणून मुस्लीम बांधव पाळणार आहे. या दिवशी शहीद-ए-आझम हजरत सय्यद इमाम हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुस्लीम समाजबांधव सामूहिकरीत्या शरबत, दूध कोल्ड्रिंक्सचे प्रसाद म्हणून वाटप करतात. या दिवशी इमामशाही दर्गाच्या आवारात हिंदू बांधव हिरवळीच्या ताबुताचे खांदेकरी होऊन संध्याकाळी पाच वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत अनवाणी पायाने उभे राहतात. हा ताबूत जुन्या नाशकातून निघणाºया मिरवणुकीत सहभागी होत नाही. ताबूत संपूर्ण पाच ते सहा तास पाच ते सहा हिंदू बांधव खांद्यावर घेऊन उभे असतात. यावेळी भाविक मनोभावे दर्शन घेताना दिसून येतात.

दहा दिवस अथक परिश्रमबांबूच्या कामट्यांपासून सुरू होणारे ताबूतनिर्मितीचे काम दहा दिवस चालते. या दहा दिवसांमध्ये मुस्लीम सय्यद कुटुंबीय अथक परिश्रम घेतात. बांबूपासून ताबुताचा साचा तयार झाल्यानंतर त्या कामट्यांभोवती कापसाचा वापर केला जातो. या कापसामध्ये अळीवच्या बियांचे रोपण केले जाते. या बियांना सकाळ-संध्याकाळ पाण्याचा स्प्रे मारला जातो. पाच ते सहा दिवसांनंतर बियांना अंकूर फुटतो आणि मुहर्रमच्या दहा तारखेला यात्रोत्सवापर्यंत हिरवळीने नटलेला ताबूत भाविकांना आकर्षित करणारा ठरतो. यासाठी मात्र दहा दिवस कुटुंबीयातील सदस्य राबतात.