शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

चारा खा.. पाणी पी.. उडून जा

By admin | Updated: May 7, 2017 04:11 IST

प्रत्येक उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांसाठी पाणी-चाऱ्याची सोय करण्याचे केवळ आवाहन केले जाते़ मात्र, प्रत्यक्षात कृती करणाऱ्यांची

- बालाजी बिराजदार -प्रत्येक उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांसाठी पाणी-चाऱ्याची सोय करण्याचे केवळ आवाहन केले जाते़ मात्र, प्रत्यक्षात कृती करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे़ याला अपवाद ठरलेय ते उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा (रवा ता़ लोहारा) गाव! एप्रिलच्या मध्यापासून या गावातील प्रत्येकाने घरांसमोर पक्ष्यांसाठी पाणी व चाऱ्याची सोय केली आहे़ मातीच्या कुंड्यात पाणी, ज्वारीची कणसे बांधल्याने भर उन्हाळ्यात या पक्ष्यांच्या चारा-पाण्याची सोय झाली आहे़उन्हाचा पारा ४४ अंशाच्या पुढे असून, गावो-गावी पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत़ याचा फटका पशू-पक्षी व वन्य प्राण्यांनाही बसत आहे़ ही बाब लक्षात घेऊन हिप्परगा (रवा) येथील धर्मवीर जाधव, अप्पा होनाळकर, प्रदीप पाटील, करण पाटील, रविकांत गिराम आदी युवक एकत्र आले़ त्यांनी स्वखचार्तून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या हेतुने मातीपासून बनविलेल्या कुंड्या विकत घेतल्या. गावातील प्रत्येक घरासमोर झाडे, घरे, छपरावर या कुंड्या बांधल्या. तसेच ज्वारीची दोन कणसे बांधली. ग्रामस्थ नियमित कुंड्यामध्ये पाणी भरून ठेवत आहेत. यामुळे भर उन्हातही पक्ष्यांच्या किलबिलीने गाव आनंदाने भरुन गेलेला असतो. लक्ष्मण कुंभारांचे लाखमोलाचे दान गावातील मातीपासून भांडी तयार  करणारे लक्ष्मण कुंभार हे थंडगार माठ खरेदी करायला येणाऱ्या ग्रामस्थाला मोफत मातीची एक कुंडी भेट देऊन पक्ष्यांसाठी घरासमोर पाणी भरून ठेवावे, असे आवाहन करीत आहेत़