शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

पैसे कमावणे सोपे, ते वापरणे अवघड; आयकर विभागाच्या नोटिशीमुळे संजय शिरसाट चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 06:03 IST

मंत्री शिरसाट यांना आयकरची नोटीस; उत्पन्नात तफावत

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. शिरसाट यांनी या नोटिसीला उत्तर देण्यासाठी आयकर विभागाकडे वेळ मागितल्याचे सांगितले.

आयसीएआयच्या एका कार्यक्रमात अतिथी म्हणून बोलताना शिंदे गटाचे मंत्री शिरसाट यांनी त्यांना आयकर विभागाने नोटीस बजावल्याची कबुली दिली. आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत, असे विधान त्यांनी केले आहे. तसेच हे वक्तव्य माझ्यासाठीच असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. शिरसाट यांना आलेली नोटीस ही शिंदेसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिरसाट चर्चेत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील वेदांत हॉटेल लिलावात त्यांच्या मुलाने सहभाग घेतला होता. यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या तक्रारीनंतर शिरसाट यांच्याकडे आयकर खात्याची वक्रदृष्टी वळल्याची चर्चा आहे.

पैसे कमावणे सोपे, ते वापरणे अवघडवर्ष २०१९ मध्ये निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती, तर २०२४ साली तुमची संपत्ती इतकी कशी झाली? असे आयकर विभागाने विचारल्याचे मंत्री शिरसाट यांनी सांगितले. याविषयी ९ जुलैपर्यंत खुलासा करण्याचे त्यांना सांगण्यात आले होते. नोटीसला उत्तर देण्यासाठी अवधी मागितला असल्याचे त्यांनी सांगितले. पैसे कमावणे सोपं आहे. मात्र, ते वापरायचे कसे हे अवघड झाल्याचं देखील त्यांनी नमूद केले.

वेदांत प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश : हॉटेल वेदांत प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यापाठोपाठ आयकर खात्याची नोटीस शिरसाट यांना आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटIncome Taxइन्कम टॅक्स