शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आधी मी CM होतो, आता DCM म्हणजेच 'डेडिकेटड टू कॉमन मॅन' झालोय- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 22:47 IST

Eknath Shinde press conference as Deputy CM : मी मुख्यमंत्री असताना दोघांनी सहकार्य केलं, आता मीही मुख्यमंत्र्यांना पूर्ण पाठिंबा देईन, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde press conference as Deputy CM : महाराष्ट्रात आज नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मतदार जनतेचे आभार मानले. तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्ते दिली. "महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. देशाला वैचारिक दिशा देणारा महाराष्ट्र आहे. या राज्याचे नेतृत्व करण्याची संधी माझ्या सारख्या शेतकऱ्याचा मुलाला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. मी आधी CM होतो, तेव्हा कॉमन मॅन समजत होतो. आता DCM झालो म्हणजेच आता मी डेडीकेटेड टू कॉमन मॅन झालो आहे," असे एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "आम्ही ४० आमदार होतो. या निवडणुकीत आता ६० झालो. ही कामाची पोहोचपावती आहे. याचा अभिमान आहे. सत्ता हे जनसेवेचं साधन आहे. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार ही भावना ठेवून काम केलं. इतिहासात त्याची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो. मी मुख्यमंत्री असताना दोघांनी सहकार्य केलं. आम्ही एक टीम म्हणून काम केलं. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण पाठिंबा देईन. मेहनतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास अधिक गतीने घडेल अशी भावना व्यक्त करतो."

"मी नाराज नाही. माझी भूमिका आधीच जाहीर केली होती. गेल्या अडीत वर्षात देशात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याने केंद्राने राज्याला भरभरुन पाठबळ दिले. यासाठी मी पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देतो. अमित शाह यांना ही धन्यवाद देतो. कारण ते आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणून गेल्या अडीच वर्षाचे कार्यकाळ यशस्वी झाला. लोकं म्हणायचे घटनाबाह्य सरकार आहे. पण जनतेने आमच्या सरकारवर मोहर लावली आहे. बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत. विरोधी पक्षाने आता रडगाणं बंद करावं आणि विकासाला साथ द्यावी," अशी खोचक टीका शिंदे यांनी केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस