मुंबई : भाजपा-शिवसेना आणि इतर पक्षांची महायुती असली तरी विधानसभा निवडणूक जागावाटपाची पहिली चर्चा शुक्रवारी केवळ भाजपा आणि शिवसेनेत होणार आहे. वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये ही बैठक होईल. भाजपा या बैठकीत 144 जागा मिळाव्यात यासाठी आग्रही राहाणार असल्याचे सूत्रंनी सांगितले. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने 169 तर भाजपाने 119 जागा लढविल्या होत्या.
रिपब्किलन पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम संघटनेला उद्याच्या चर्चेसाठी बोलाविलेले नाही. युतीने आपसात चर्चा करून फॉम्यरूला ठरवावा आणि नंतर इतर पक्षांशी चर्चा करावी, असे ठरल्याचे सूत्रंनी सांगितले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. शिवसेना आणि भाजपाचे पाच-पाच नेते सहभागी होतील. बैठकीतील निर्णयांची माहिती ठाकरे आणि भाजपा श्रेष्ठींना देण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)