शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘ई’ वॉर्ड - शिवसेनेचा ‘अभासे’सोबत काडीमोड!

By admin | Updated: January 30, 2017 21:49 IST

दक्षिण मुंबईतील अधिक चर्चेचा वॉर्ड म्हणून ओळख असलेल्या ‘ई’ वॉर्डमध्ये यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळणार आहे.

चेतन ननावरे/मुंबई : दक्षिण मुंबईतील अधिक चर्चेचा वॉर्ड म्हणून ओळख असलेल्या ‘ई’ वॉर्डमध्ये यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत याठिकाणी काँग्रेस, शिवसेना, अखिल भारतीय सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वच पक्षांचे वर्चस्व दिसले होते. मात्र यंदा भारतीय जनता पक्षासोबत काडीमोड घेण्याच्या विचारात असलेली शिवसेना अखिल भारतीय सेनेसोबतची युतीही तोडण्याचा विचार करत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. तसे झाल्यास अभासेसमोरील समस्या वाढणार असून सर्वच राजकीय समीकरणे बदलणार आहेत.प्रभागरचनेत झालेल्या बदलाचा सर्वात मोठा फटका ‘ई’ वॉर्डला बसला आहे. गेल्यावेळी वॉर्डमध्ये एकूण आठ नगरसेवक पदांसाठी निवडणुका रंगल्या होत्या. मात्र यंदा वॉर्डमधील एक प्रभाग दुसऱ्या वॉर्डमध्ये सरकला आहे. त्यामुळे केवळ सात प्रभागांसाठी निवडणुका रंगणार आहेत. २०१२ सालच्या महापालिका निवडणुकीनुसार ई वॉर्डमध्ये काँग्रेसचे तीन, शिवसेनेचे दोन, अभासेचे दोन आणि मनसेचा एक नगरसेवक होता. तर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. याउलट काँग्रेस आणि सेनेच्या प्रत्येकी एका उमेदवारालाही मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. लोकसभा आणि विधानसभेतील मतांची संख्या पाहता, तूर्तास काँग्रेसला तरी याठिकाणी आहे त्या जागेवरील सत्ता टिकवण्याचे आव्हान असेल.नव्या प्रभागरचनेनंतर वॉर्डमध्ये अनुसुचित जाती आणि इतर मागास वर्गीय उमेदवारांसाठी प्रत्येकी एक प्रभाग राखीव झाला आहे. तर तब्बल पाच खुले प्रभाग निर्माण झाले आहेत. खुल्या प्रभागांमधील दोन प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे याठिकाणी इच्छुकांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. परिणामी नाराजांची संख्या वाढून आयाराम-गयारामांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे....................‘अभासे’ची वाट बिकट!प्रभागांत झालेल्या बदलाचा सर्वाधिक फटका अभासेला बसण्याची शक्यता आहे. कारण गीता गवळी आणि वंदना गवळी या दोन्ही नगरसेविकांच्या प्रभागात बरेच बदल झाले आहेत. त्यात गेल्यावेळी अपक्ष राहत गवळी यांना बऱ्यापैकी टक्कर दिलेल्या रोहिदास लोखंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याशिवाय विधानसभेत गवळी यांच्या प्रभागातून खोऱ्याने मते मिळवलेल्या आॅल इंडिया मजलीस-ई-इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीचे (एआयएमआयएम) आव्हानही गवळी यांच्यासमोर राहील................................मनसे डोके वर काढणार का?गेल्या निवडणुकीत एक जागा जिंकून मनसेला याठिकाणी दोन जागांवर थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. नव्या प्रभाग रचनेला फायदा शिवसेनेसोबत मनसेलाही होणार आहे. त्यामुळे अभासेसोबत युती तोडल्यानंतर शिवसेना किंवा मनसेच्या जागांत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.........................राणीबागेचा मुद्दा गाजणार!वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणी बाग हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले प्राणिसंग्रहालय ‘ई’ वॉर्डमध्ये येते. राणीबागेचा रखडलेला पुनर्विकास आणि नुकताच मरण पावलेला पेंग्वीन हे पालिका निवडणुकीत कळीचे मुद्दे ठरतील. याशिवाय मातंग समाजाची मते मिळवण्यासाठी राणीबागेतील अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचा विषयही राजकीय पक्षांकडून वापरला जाईल....................२०१२ साली ई वॉर्डातील विजयी आणि पराभूत उमेदवारवॉर्डविजयी उमेदवारप्राप्त मतेपराभूत उमेदवारप्राप्त मते२०२समिता नाईक (मनसे)९,३०९स्मिता बनसोड (राष्ट्रवादी काँग्रेस)६,९४०२०३रमाकांत रहाटे (शिवसेना)९,९८५नितिन केरकर (मनसे)८,६१४२०४वंदना गवळी (अभासे)८,२७९रोहिदास लोखंडे (अपक्ष)५,२५७२०५गीता गवळी (अभासे)९,१३८अब्दुल काजी (काँग्रेस)४,३४०२०६फैय्याज खान (काँग्रेस)१०,८६०भारतकुमार जैन (भाजप)२,७२२२०७यामिनी जाधव (शिवसेना)७,१५६हर्षदा सुर्वे (राष्ट्रवादी काँग्रेस)६,१०४२०८मनोज जामसुतकर (काँग्रेस)७,५८१यशवंत जाधव (शिवसेना)४,५४६२०९शहाना खान (काँग्रेस)६,५९६आशा मामिडी (मनसे)६,२३१........................................................................................................................................प्रभाग क्रमांक- २०७आरक्षण खुला (महिला)एकूण लोकसंख्या : ५३,८४८अनुसूचित जाती : ५,२५३अनुसूचित जमाती : ३३७प्रभागाची व्याप्ती : कस्तुरबा रूग्णालय, भायखळा रेल्वे स्थानक, डॉ. कंपाऊंड.........................................प्रभाग क्रमांक- २०८आरक्षण खुलाएकूण लोकसंख्या : ५७,१२१अनुसूचित जाती : २,१५२अनुसूचित जमाती : ३४७प्रभागाची व्याप्ती : फेरबंदर, जीजामाता उद्यान, घोडपदेव, ठक्कर इस्टेट..............................प्रभाग क्रमांक- २०९आरक्षण खुलाएकूण लोकसंख्या : ५५,६२२अनुसूचित जाती : ३,३५५अनुसूचित जमाती : ९२६प्रभागाची व्याप्ती : दारुखाना, एकता नगर, वाडी बंदरव अंजिरवाडी,..........................प्रभाग क्रमांक- २१०आरक्षण अनुसुचित जाती (महिला)एकूण लोकसंख्या : ५२,०७०अनुसूचित जाती : ५,८७८अनुसूचित जमाती : ४२९प्रभागाची व्याप्ती : जे.जे. रूग्णालय, ताडवाडी, मुस्तफ्फा बाजार.......................प्रभाग क्रमांक- २११आरक्षण इतर मागासवर्गएकूण लोकसंख्या : ५९,६४१अनुसूचित जाती : ४१०अनुसूचित जमाती : ११४प्रभागाची व्याप्ती : मदनपुरा, न्यू नागपाडा, भायखळा अग्निशमन दल केंद्र................प्रभाग क्रमांक-२१२आरक्षण खुला (महिला)एकूण लोकसंख्या : ५६,२७८अनुसूचित जाती : २,१७८अनुसूचित जमाती : १४१प्रभागाची व्याप्ती : आग्रीपाडा, आर.टी.ओ., भायखळा (प), वाय.एम.सी. मैदान.......................प्रभाग क्रमांक- २१३आरक्षण खुलाएकूण लोकसंख्या : ५८,२८७अनुसूचित जाती : २,९६६अनुसूचित जमाती : ३१३प्रभागाची व्याप्ती : काजीपुरा, सिद्धार्थनगर, छोटा सोनापुर..................