शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

ई-बसमधून देताहेत ई-लर्निंगचे धडे

By admin | Updated: May 26, 2014 02:41 IST

माहिती-तंत्रज्ञानाच्या जोरावर भारत महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव -  माहिती-तंत्रज्ञानाच्या जोरावर भारत महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे हेच माहिती-तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे ही निकड ओळखून संजीवनी फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी ‘ई-बस’ ही नवी संकल्पना घेऊनत्यांनी संगणक विद्यार्थ्यांच्या दारातच नेऊन ठेवले आहे, तेही मोफत. आतापर्यंत १७ शाळांमधील १३०० विद्यार्थी संगणक साक्षर झाले आहे़ ‘संजीवनी तंत्रज्ञान आपल्या दारी, चला करू या मैत्री तंत्रज्ञानाशी’ हे ब्रिद घेऊन सहा महिन्यांपूर्वी संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या संकल्पनेतून ई-बसचा जन्म झाला़ वीस लॅपटॉप, प्रोजेक्टर, इंटरनेट कनेक्शन असा कॉम्प्युटर लॅबसारखा सेटअप असलेली ‘संजीवनी ई-बस’ सज्ज झाली़ प्रा़ वैभव परजणे यांच्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याची जबाबदारी टाकण्यात आली़ आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना बेसिक कॉम्प्युटर आॅपरेशन, वर्ड, पॉवर पॉइंट, हार्डवेअरची माहिती, ई-मेल अकाउंट तयार करणे, इंटरनेटवर एखाद्या विषयाची माहिती उपलब्ध करून घेणे याबाबतची माहिती ‘संजीवनी ई-बस’च्या माध्यमातून दिली जाते़ आजवर कोपरगाव तालुक्यातील १७ शाळांमधील १३०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले तेही मोफत़ पाठ्यपुस्तकाशिवाय संगणकाचे ज्ञान मिळाल्याने विद्यार्थी व त्यांचे पालक खूश आहेत़ इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयसीटी हा विषय आहे़ परंतु ग्रामीण भागातील शाळांमध्ये संगणक उपलब्ध नाहीत़ त्यामुळे ‘संजीवनी ई-बस’चा फायदा विद्यार्थ्यांना होतो आहे़