शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

ई-कनेक्टिव्हिटीतही तुटला नात्याचा ‘धागा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 04:44 IST

परदेशात राहणारे ऋतुराज सहानी (४५) हे मोबाइलच्या एका क्लिकवर जगभराच्या संपर्कात होते. मात्र, जगाशी कनेक्ट होताना जन्मदात्या आईशी असलेल्या नात्याचा धागा कधी तुटला, हे त्यांनाच समजले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : परदेशात राहणारे ऋतुराज सहानी (४५) हे मोबाइलच्या एका क्लिकवर जगभराच्या संपर्कात होते. मात्र, जगाशी कनेक्ट होताना जन्मदात्या आईशी असलेल्या नात्याचा धागा कधी तुटला, हे त्यांनाच समजले नाही. आई राहात असलेल्या सोसायटीचे मेंटनन्स, लाइट बिल न चुकता मोबाइल बँकिंगने भरणाºया ऋतुराज यांना, त्याच मोबाइलद्वारे वर्ष, सव्वा वर्ष संपर्कात नसलेल्या आईशी दोन घटका बोलावेसे वाटले नाही. आईचा मृदतेह घरात कुजून त्याचा सांगाडा झाला, तरी आई गेल्याचे त्यांना कळलेच नाही.अंधेरी लोखंडवाला बेल स्कॉट टॉवर या उच्चभू्र सोसायटीतील बंद फ्लॅटमध्ये आशा सहानी (वय ६३ ) यांचा सांगाडा शनिवारी आढळून आला. अमेरिकेतून आलेल्या ऋतुराज सहानी यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर, हा प्रकारउघडकीस आला. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी सहानी यांचा मुलगा ऋतुराज याचा जबाब नोंदविला. ज्यात सहानी यांनी मुलाला ‘तू माझी काळजी करू नकोस, मी वृद्धाश्रमात निघून जाईन,’ असे सांगितले होते. १९९७ पासून ऋतुराज हे अमेरिकेत वास्तव्यास आहेत. २० एप्रिल, २०१६ रोजी त्यांचेआईसोबत शेवटचे बोलणे झालेहोते.२०१३ मध्येच आशा यांनी मोलकरणीला कामावरून काढून टाकले, तसेच पेपरवालाआणि दूधवाल्यालादेखील येऊ नको, असे सांगितले होते. त्यांचा मुलगा सोसायटीचे मेंटेनन्स, लाइट बिल मोबाइल बँकिंगने भरत होता. मात्र, २० एप्रिलनंतर वर्षभर आशा आणि ऋतुराज यांच्यात काहीच संपर्क झाला नव्हता. आई वृद्धाश्रमात गेली असावी, त्यामुळे तिने फोन बंद केलाअसावा, असे त्यांना वाटल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.तसेच आशा यांनी त्यांच्या घराची चावीदेखील शेजारी अथवानातेवाईक अशी कोणाकडेचदिली नव्हती. त्यामुळे शेजाºयांनीदेखील दरवाजा उघडून पाहण्याचे कारण नव्हते. त्यामुळे अजूनही आशासहानी यांच्या मृत्यूचे गूढ कायम असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय‘आशा सहानी यांचे शवविच्छेदन सोमवारी करण्यात आले. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप उघड झालेले नाही,’ अशी माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी दिली. आशा सहानी यांचे कपडे कुठेही फाटलेले नाहीत, त्यामुळे मृत्युपूर्वी झटापट झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही.कदाचित झोपेत त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला असेल, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, तपास अधिकारी न्यायवैद्यक प्रयोग शाळेच्या अहवालाची वाट पाहात आहेत.कुजलेल्या मृतदेहाची दुर्गंधी कशी आली नाही?आम्हाला कसलीच दुर्गंधी आली नाही, असे शेजाºयांनी पोलिसांना सांगितले. मात्र, सहानी यांच्या घराचे व्हेंटिलेशन अत्यंत व्यवस्थित आहे. त्यामुळे घरात कुजलेल्या मृतदेहाचा उग्र वास शेजाºयांना कसा आला नाही, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.