शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

पाच वर्षाच्या चिमुकल्याचे देहदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 14:13 IST

पोटच्या गोळ्याच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून डॉक्टर असलेल्या माता-पित्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) त्याचे देहदान करीत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला.

संतोष हिरेमठऔरंगाबाद, दि. २७ : वाळूज बजाजनगर परिसरातील पाच वर्षाच्या चिमुकल्याने अचानक या जगातून निरोप घेतला. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले, मात्र पोटच्या गोळ्याच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून डॉक्टर असलेल्या माता-पित्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) त्याचे देहदान करीत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला.

आजारपणामुळे रुद्र प्रदीप देशमुख (५)असे या जगातून मंगळवारी अचानक निरोप घेतलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. मुलाच्या अचानक जाण्यामुळे त्याच्यावर संपूर्ण कुटुंब दु:खात बुडाले. परंतु अशा कठीण प्रसंगीही त्यांनी स्वत:ला सावरत एक मोठा निर्णय घेतला. रुद्रचे आयुष्य सार्थकी लागावे आणि त्यांच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात योगदान देण्यासाठी त्यांनी त्याचा देह घाटी रुग्णालयास दान करण्याचा निश्चय केला. एक आई-वडील म्हणून अनेकांना असा निर्णय घेणे अवघड होईल. परंतु रुद्रच्या आई-वडिलांनी आपल्या भावना सावरत आपल्या चिमुकल्याचे देहदान करीत एक वेगळा आदर्श निर्माण केला. देहदानासाठी कुटुंबिय, नातेवाईकांचेही त्यांना पाठबळ मिळाले.

वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीसाठी व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानवी शरीररचनेचा अभ्यास आवश्यक असतो. त्यासाठी देह उपलब्ध होणे महत्वाचे ठरते. रक्तदान, नेत्रदानाबरोबर देहदान ही संककल्पना समाजात हळूहळू रुजी लागली आहे. घाटी येथे विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्यात येते. एमबीबीएस, बीडीएस आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वर्षाला किमान २० मानवी मृतदेहांची आवश्यकता असते. समाजामध्ये देहदानाविषयी जनजागृती होण्यासाठी घाटीतील शरीररचनाशास्त्र विभागाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येतात.

देहदानाविषयी अंधश्रद्धा दूर करून त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि देहदान करणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी एक समिती कार्यरत आहे. परिणामी, मागील काही वर्षांत देहदानाच्या प्रमाणात वाढ मोठ्या व्यक्तींचे देहदान नियमित होतात. परंतु लहान मुलांचे देहदान क्वचितच घडते. पाचवर्षीय चिमुकल्याचे देहदान वैद्यकीय इतिहासात आणि वैद्यकीय शिक्षणासाठी, संशोधनासाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरले. दुर्मिळ बाब१८ वर्षावरील कोणताही व्यक्ती देहदानाचा संकल्प करू शकतो. त्याखालील व्यक्तीच्या देहदानासाठी आई-वडिलांची संमती आवश्यक असते. अवघ्या पाच वर्षाच्या मुलाचे झालेले देहदान ही दुर्मिळ बाब आहे, असे शरीररचनाशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.