शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ह्रदयद्रावक! कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरचा रुग्णवाहिकेतच मृत्यू; नेमकं घडलं काय?

By अनिल गवई | Updated: August 21, 2022 17:27 IST

कर्तव्यावरील डॉक्टरचा रूग्णवाहिकेतच मृत्यू, रोहणा येथील घटना: डॉक्टरचा मृतदेह स्वीकारण्यास कुटूंबियांचा नकार

अनिल गवई खामगाव -  बुलढाणा जिल्ह्यातील रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रात आकस्मित सेवेसाठी असलेली १०८ रुग्णवाहिकेवरील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर ओमप्रकाश सूर्यवंशी यांचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला आहे. मध्यरात्री एका गंभीर रुग्णाला घेण्यासाठी जात असताना धावत्या रुग्णवाहिकेत डॉक्टराचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. मध्यरात्री डॉ. सूर्यवंशी यांना एका रुग्णाचा फोन आल्याने ते रुग्णवाहिका चालक यांना घेऊन रुग्णाच्या घरी जात असताना अचानक धावत्या रुग्णवाहिकेत त्यांची तब्येत अचानक बिघडली तात्काळ रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान ठेऊन त्यांना खामगाव सामान्य रुग्णालयात आणले पण तोपर्यंत डॉ.सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. 

ही माहिती सदर रुग्णवाहिका संचालन करणाऱ्या भारत विकास ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली पण १२ तास उलटून गेल्यावरही संबंधित कंपनीचे जिल्ह्याचे प्रबंधक अजिंक्य लवंगे यांनी अजूनही याठिकाणी भेट न दिल्याने डॉ.ओमप्रकाश सूर्यवंशी यांचे नातेवाईक व 108 रुग्णवाहिकेचे चालक व डॉक्टर्स यांनी संताप व्यक्त केला. जो पर्यंत भारत विकास ग्रुप कंपनीचे अधिकारी या ठिकाणी येणार नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. भारत विकास ग्रुप कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या तणावाला डॉ सूर्यवंशी बळी पडल्याचा आरोप यावेळी कर्मचारी करत आहे. अजूनही मृतदेह सामान्य रुग्णालयात पडून आहे.

सामान्य रूग्णालयात तणावाचे वातावरणकर्तव्यावरच डॉ. सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला सामान्य रूग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली असून, नातेवाईकांनी अतिरिक्त ताणामुळे डॉ. सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. त्यांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सामान्य रूग्णालयात रविवारी काही काळ तणाव निर्माण झाला.

रूग्णवाहिकेत कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. सामान्य रूग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. - डॉ. निलेश टापरे, वैद्यकीय अधिक्षक सामान्य रूग्णालय, खामगाव. 

टॅग्स :doctorडॉक्टर