शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या काळात दिलासा देणारा प्रकल्पच फेल

By admin | Updated: July 4, 2016 20:07 IST

पावसाच्या बदलत्या ट्रेण्डमुळे दरवर्षी पाणीप्रश्न भीषण रुप घेऊ लागला आहे़ त्याचवेळी पाणीटंचाईवर तोडगा म्हणून हाती घेतलेला रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प मात्र फेल गेला आहे़

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ४ : पावसाच्या बदलत्या ट्रेण्डमुळे दरवर्षी पाणीप्रश्न भीषण रुप घेऊ लागला आहे़ त्याचवेळी पाणीटंचाईवर तोडगा म्हणून हाती घेतलेला रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प मात्र फेल गेला आहे़. वारंवार सुचना व कारवाईचा धाक दाखवून मुंबईत हजारो नवीन इमारतींमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत नसल्याचे उजेडात आले आहे़ त्यामुळे छतावरुन हजारो लीटर पावसाचे पाणी वाहून वाया जात आहे़भूजलाची पातळी दिवसेंदिवस खालवत असल्याने पालिकेने ५०० चौ़मी़ जागेतील इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सक्तीचा केला़ इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी मालमत्ता करात सूट देण्याची योजना १ एप्रिल २०१० पासून पालिकेने अंमलात आणली़ राज्य सरकारने धोरण व नियमावली तयार न केल्यामुळे या योजनेचे निकष आणि इमारतींवर देखरेखीसाठी यंत्रणा उभी राहू शकली नाही़ तसेच खर्चिक असल्याने अनेक इमारती या प्रकल्पासाठी इच्छुक नाहीत़

मुंबईत मोठ्या प्रमाणात इमारतींची पुर्नबांधणी होत आहे़ मात्र या इमारतींमध्ये हा प्रकल्प राबविला जात नाही़ पालिकेचे उद्यान, शाळा व रुग्णालयांमध्येही हा प्रकल्प उभारण्याबाबत प्रशासनच उदासिन असल्याचेही दिसून आले आहे़ त्यामुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये हजारो इमारतींची भर पडली़ तरी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प १० टक्के इमारतींमध्येही नसल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे़