शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईमध्ये नौदलाच्या भरतीवेळी चेंगराचेंगरी

By admin | Updated: September 10, 2016 06:07 IST

मुंबईच्या मालाड परिसरात नौदलाच्या भरतीदरम्यान शुक्रवारी सकाळी उडालेल्या गोंधळानंतर चेंगराचेंगरी होऊन चार तरुण जखमी झाले.

मुंबई : मुंबईच्या मालाड परिसरात नौदलाच्या भरतीदरम्यान शुक्रवारी सकाळी उडालेल्या गोंधळानंतर चेंगराचेंगरी होऊन चार तरुण जखमी झाले. या भरतीस अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने तसेच योग्य व्यवस्थापनाअभावी ही घटना घडल्याचे उमेदवारांनी सांगितले. यादरम्यान उमेदवारांवर मालवणी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप केला जात असून, मालवणी पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे.नौदलाच्या आयएनएस हमलाच्या तळावर जवळपास १० हजार उमेदवार गुरुवारी रात्रीपासून दाखल झाले होते. नौदलाच्या स्पेशल रिक्रुटमेंट ड्राइव्ह फॉर सिनियर सेकंडरी रिक्रुट्स (एसएसआर) या पदासाठी ही भरतीप्रक्रिया सुरू होती. सकाळी साडेपाच वाजता मैदानाचे गेट उघडणार होते. मात्र ते अर्धा तास उशिरा उघडले गेले. 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह', या तत्त्वानुसार होणाऱ्या या भरतीत आपला क्रमांक आधी लागावा, म्हणून गेट उघडताच हजारो उमेदवारांनी एकाच वेळी या मैदानात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यातून एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. यात काहींना किरकोळ दुखापत झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या उमेदवारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नौदलाकडून उभारण्यात आली नव्हती; त्यामुळे हा गोंधळ झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)>धावपळीत चार जण किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे लाठीचार्जच्या बातमीत काही तथ्य नाही, कारण असा प्रकार घडलेलाच नाही. - मिलिंद खेतले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस ठाणेपोलिसांनी जे केले ते फार चुकीचे होते. या सगळ्यामुळे मी मुलाखतीला मुकलो आणि त्यात माझ्या डोळ्यालाही मार बसला, ज्यासाठी मला पुण्याला जाऊन उपचार घ्यावे लागणार आहेत.- स्वप्निल जगताप, जखमी उमेदवार