शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
5
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
6
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
7
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
8
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
9
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
10
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
11
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
12
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
13
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
14
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
15
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
16
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
17
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
18
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
19
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
20
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

गणेशोत्सवाच्या काळात भाविकांनो सावधान...

By admin | Updated: September 21, 2015 14:39 IST

गणेशोत्सवाच्या काळामध्ये कुटुंबासह घराबाहेर पडणाऱ्या भक्तांवर नजर ठेऊन असलेले चोऱ्या, लूटमार करणारे गुन्हेगार सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत

मनीषा म्हात्रे, मुंबईगणेशोत्सवाच्या काळामध्ये कुटुंबासह घराबाहेर पडणाऱ्या भक्तांवर नजर ठेऊन असलेले चोऱ्या, लूटमार करणारे गुन्हेगार सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. गेल्यावर्षी महिनाभराच्या कालावधीत शहरात सरासरी ५०० चोऱ्या, २५० घरफोड्या आणि १०० सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात होत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांकडील आकडेवारीतून समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी सावधगिरीचा इशारा देत गणेशभक्तांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गणेशोत्सवाची चाहूल लागताच मुंबईत नोकरी करणाऱ्या चाकरमान्यांची पावले आपोआप गावाच्या दिशेने वळतात. संपूर्ण कुटुंब दीड दिवस, पाच दिवस तर काही कुटुंबे अनंत चतुर्थीपर्यंत बाप्पाच्या सेवेसाठी घराला टाळे ठोकून गावी रवाना होतात. ही संधी साधून मराठी कुटुंबे राहत असलेल्या भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, दादर, चिंचपोकळी, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव परिसरातील बंद घरांमध्ये लुटारू हात साफ करताना दिसत आहेत. बाप्पांच्या आगमनापूर्वी १३ सप्टेंबरपर्यंत ११५ घरफोड्या झाल्या असून, त्यापैकी अवघ्या १८ घरफोड्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी, चेंबूर, अंधेरी, फोर्ट आणि विलेपार्लेसारख्या ठिकाणी बाप्पांची दर्शनासाठी गर्दी पाहावयास मिळते. याच गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी, चोरी तसेच महिलांच्या छेडछाडीच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. आतापर्यंत ३०८ चोरी, ३८ सोनसाखळी आणि ८७ विनयभंगाच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात २५५ मुंबईकरांचे घर लुटले गेले. पैकी ४२ गुन्ह्यांची उकल झाली, तर ५३५ चोरी, आणि १०३ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. १६७ महिलांच्या विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. याला आवर घालण्यासाठी पोलिसांनी पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. ठिकठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे, तरीही पोलिसांची नजर चुकवून गर्दी, बंद घरांचा गैरफायदा घेत भाविकांची लूट सुरूच आहे. त्यामुळे भाविकांनीही गर्दीत सतर्क राहण्याची गरज आहे. गर्दीत दागिने घालू नयेत. तसेच गावी असल्यास शेजारी अथवा जवळच्या नातेवाइकांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगावे, असे आवाहन मुंबई पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.