शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

बंद काळात परराज्यातील निकृष्ट भाजी मुंबईकरांच्या माथी

By admin | Updated: June 9, 2017 05:01 IST

शेतकरी संपाच्या काळात मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाल्याने परराज्यातील निकृष्ट दर्जाचा मालही मुंबईकरांच्या माथी मारण्यात आला

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शेतकरी संपाच्या काळात मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाल्याने परराज्यातील निकृष्ट दर्जाचा मालही मुंबईकरांच्या माथी मारण्यात आला. टोमॅटो, फ्लॉवर व इतर सडक्या भाज्याही जादा दराने विकण्यात आल्या. दोन दिवसांपासून आवक प्रचंड वाढल्याने बाजारभाव गडगडले असून, खराब झालेल्या टोमॅटो व इतर भाज्यांचे ढिगारे बाजार समितीमध्ये पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. हमीभावासह प्रलंबित मागण्यांसाठी १ जूनपासून राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा २ जूनपासून मुंबईकरांना फटका बसला. राज्यातून कृषी माल विक्रीसाठी येणार नसल्याने व्यापाऱ्यांनी गुजरात, कर्नाटक, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेशामधून जो माल उपलब्ध होईल तो विक्रीसाठी मागविला होता. कर्नाटक व गुजरातमधून सर्वात जास्त आवक होऊ लागली होती. मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाल्याने बाजारभाव प्रचंड वाढले. याचा गैरफायदा घेऊन परराज्यातील व्यापाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचा मालही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठविला. विशेषत: कर्नाटकमधून सडलेले टोमॅटो विक्रीला आले. कर्नाटकमधून मुंबईमध्ये माल घेऊन येणाऱ्या ट्रकला २४ तासांचा प्रवास करावा लागतो. त्यापूर्वी एक दिवस अगोदर शेतामधून माल काढण्यात येतो. पॅक केलेला हलक्या दर्जाचा माल येथे येईपर्यंत पूर्ण खराब होऊ लागला होता. चांगल्या मालाच्या क्रेटमध्ये खराब माल ठेवण्यात आल्याने किरकोळ विक्रेत्यांनी तो खरेदी करून ग्राहकांना विकला. कमी प्रतीचा टोमॅटो किरकोळ मार्केटमध्ये १०० रुपये किलोने विकला गेला.बंद काळात मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. दोन दिवसांपासून पुणे, नाशिक, सातारा परिसरातून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. पुणे व सोलापूरमधील चांगल्या दर्जाचा टोमॅटो विक्रीसाठी येत असून त्याला भाव मिळत नव्हता. >राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान७ जूनपासून मुंबईमध्ये पुणे, नाशिक व राज्याच्या इतर भागातून कृषीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे. परंतु आवक वाढल्याने आता राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेनासा झाला असून त्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. कमी दराने माल विकावा लागत असून विक्री न झालेला व खराब झालेला माल फेकावा लागत आहे. संप सुरू झाल्यापासूनची आवक दिनांकआवक टोमॅटो फ्लॉवर२ जून५७१४२६३ जून१०९९६७७७५ जून१७१५३३०१५१६ जून१३५९१९२११८७ जून२२४०५६९३५४८ जून१९८७४१५२८५>गुरुवारची राज्यनिहाय आवकराज्यआवक (ट्रक)महाराष्ट्र४२३कर्नाटक१३गुजरात३१दिल्ली१७मध्य प्रदेश१२उत्तर प्रदेश१४तामिळनाडू६आंध्र प्रदेश५शेतकरी बंदच्या काळात तुटवडा असल्याने परराज्यातून कृषीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत होता. भाव चांगला मिळत असल्याने खराब मालही काही प्रमाणात विक्रीसाठी पाठविण्यात आला. वाहतुकीदरम्यान काही माल खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. - शंकर पिंगळे, व्यापारी प्रतिनिधी, मुंबई एपीएमसी