ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. ११ - मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील नंदुरबार-उधना दरम्यान रेल्वेला झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील अनेक गाड्या रद्द तर अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.यात सोमवारी भुसावळ येथून सकाळी ८.३० वा. सुटणारी ५९०७८ भुसावळ-सुरत पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. सोमवारी पहाटे १२.२५ वाजता भुसावळ येथून सुटणारी भुसावळ-सुरत फास्ट पॅसेंजर रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.पुरी एक्स्प्रेस रद्द - अपघातामुळे या मार्गावरील अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. नवजीवन एक्स्प्रेस,ताप्तीगंगा एक्स्प्रेस या गाड्या भुसावळ,खंडवा,भोपाळ, रतलाम मार्गे वळविण्यात आल्या आहेत.
- डाऊन मार्गावरील सकाळी ११ वा. भुसावळ येथे येणारी अमदाबाद-हावडा एक्स्प्रेस अहमदाबाद,भोपाळ अशी वळविण्यात आली आहे.