शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीच्या पाण्यामुळे राक्षसभुवनचे शनी महाराज पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 06:24 IST

बीड जिल्ह्यात पावसाची जवळपास ३१ टक्के तूट आहे आणि तेथील शेतकरी वरुणराजाची वाट पाहून थकले आहेत.

- सखाराम शिंदे गेवराई (जि.बीड) : बीड जिल्ह्यात पावसाची जवळपास ३१ टक्के तूट आहे आणि तेथील शेतकरी वरुणराजाची वाट पाहून थकले आहेत. असे असले, तरी सोमवारी गोदावरी नदी दुथडी वाहिली आणि गेवराई तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील आत्मतीर्थ पूर्णपणे व राक्षसभुवन येथील शनी महाराज मंदिर अर्धे पाण्याखाली गेले. जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. तुडुंब वाहत असलेल्या या नदीचे हे रूपडे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.शनीच्या साडेतीन पीठापैकी एक पीठ असलेल्या राक्षसभुवन येथील शनी महाराज यांच्या मूर्ती अर्ध्या बुडाल्या आहेत.तालुक्यातील ३२ गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. महसूलचे पथक तयार असल्याचे तहसीलदार धोंडीबा गायकवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जायकवाडी धरणातून सोमवारी दुपारी ६,८२९ क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील ३२ गावांत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील आत्मतीर्थ दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले.