शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

महिलेच्या सतर्कतेमुळे चोर २४ तासांत गजाआड

By admin | Updated: July 19, 2016 04:19 IST

रुग्णालयातून परतत असताना, एका महिलेवर सोनसाखळी चोराने हल्ला करत, तिचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : रुग्णालयातून परतत असताना, एका महिलेवर सोनसाखळी चोराने हल्ला करत, तिचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने त्याला विरोध करताच, त्याने महिलेवर हल्ला करत पळ काढला. याबाबत महिलेने तत्काळ पोलिसांना माहिती देताच नेहरूनगर पोलिसांनी या सराईत आरोपीला २४ तासांत अटक केली असून, ईश्वर काळे (२५) असे त्याचे नाव आहे.ज्योती सरदार असे या प्रकरणातील महिलेचे नाव असून, ती नेहरूनगर परिसरात राहते. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ती तिच्या बहिणीला रुग्णालयात बघण्यासाठी गेली होती. काही वेळाने ती घरी परतत असताना चेंबूरच्या टेंभी ब्रिजजवळ एका सोनसाखळी चोराने तिच्यावर हल्ला करत, तिचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने त्याला विरोध केल्याने चोराने महिलेला मारहाण केली. त्यानंतर, अर्धवट तुटलेले मंगळसूत्र घेऊन पळ काढला. या हल्ल्यात महिलेच्या मानेवर मार लागला. त्यामुळे स्थानिकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केली. नेहरूनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी महिलेची भेट घेत गुन्हा दाखल केला, तसेच महिलेने आरोपीला पाहिले असल्याने पोलिसांनी तत्काळ रेखाचित्र तयार केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपरडे यांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत, आरोपीच्या शोधासाठी एक पथक तयार केले. या पथकाकडून शोध सुरू असतानाच रेखाचित्रामधील आरोपी हा चेंबूर परिसरातीलच राहणारा असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचत ईश्वर काळे (२५) या आरोपीला शनिवारी अटक केली. चौकशीत त्याने अनेक महिलांचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली (प्रतिनिधी)नेहरूनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी महिलेची भेट घेत गुन्हा दाखल केला, तसेच महिलेने आरोपीला पाहिले असल्याने पोलिसांनी तत्काळ रेखाचित्र तयार केले.रेखाचित्रामधील आरोपी हा चेंबूर परिसरातीलच राहणारा असल्याचे पोलिसांना समजले.