शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

वृक्षलागवडीमुळे व्याघ्र प्रकल्पांचा सीमावर्ती प्रदेशही होणार हिरवागार

By अोंकार करंबेळकर | Updated: September 1, 2017 12:37 IST

मध्य भारत आणि इतर प्रदेशामध्ये वनांच्या बफर झोनमध्ये 48 हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. यासाठी सामाजिक वने विभाग, वनखाते आणि इतर नर्सरींमध्ये रोपांचे संगोपन करुन निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देलागवड झालेल्या रोपांमध्ये जांभूळ, आवळा, चिरोंजी, सिताफळ, महू, शिसव, क़ूनिंब, आंबा, बेल, बांबू, करंज या झाडांचा समावेश केला आहे. सातपुडा व्याघ्र प्रकल्पविभागाच्या बफर प्रदेशामध्ये 15,555, नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळ 7100, कान्हाजवळ 8278, ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाजवळ 8070, पेंच (म.प्र) जवळ 4375, पेंच (महाराष्ट्र) जवळ 3607 तर मेळघाटाच्या बफर झोनमध्ये 1228 रोपांची लागव

मुंबई दि.1- अमर्याद चराई आणि जळाऊ लाकडाच्या तोडीमुळे व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने आणि जंगलांच्या सीमावर्ती प्रदेशात झाडांची मोठी तूट होत असते. या तोडीमुळे जंगलांची आणि पर्यावरणाची न भरून येणारी हानी होत असते. यावर एकमेव उत्तर पुन्हा वृक्षलागवडच असल्याने विदर्भात आणि मध्यप्रदेशामध्ये सातपुडा फाऊंडेशनने बफर झोनमध्ये नव्या रोपांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. गेले दोन पावसाळे ते ग्रामस्थ, ग्रामपंचायतींच्या साथीने हा उपक्रम राबवत आहेत. हा उपक्रम राबवणाऱ्यासाठी नागपूरचे अजय पोतदार, पंचमढीचे अश्रफ आरबी, ताडोबाचे प्रामिक कन्नन, मेळघाटाचे अशोक आठवले, नवेगाव-नागझिराचे मुकुंद धुर्वे आणि कान्हाचे अमित अवस्थी यांची मदत झालेली आहे.

या उपक्रमामध्ये मध्य भारत आणि इतर प्रदेशामध्ये आजवर 48 हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. यासाठी सामाजिक वने विभाग, वनखाते आणि इतर नर्सरींमध्ये रोपांचे संगोपन करुन निवड करण्यात आली आहे. या रोपांमध्ये जांभूळ, आवळा, चिरोंजी, सिताफळ, महू, शिसव, क़ूनिंब, आंबा, बेल, बांबू, करंज या झाडांचा समावेश केला आहे. गेल्या पावसाळ्यामध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये गावकरी आणि शाळांमधील मुलांनी सहभाग घेतला तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारील गावांमधील ग्रामपंचायती, स्थानिक समुदायांनी मदत केली. सातपुडा व्याघ्र प्रकल्पविभागाच्या बफर प्रदेशामध्ये 15,555, नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळ 7100, कान्हाजवळ 8278, ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाजवळ 8070, पेंच (म.प्र) जवळ 4375, पेंच (महाराष्ट्र) जवळ 3607 तर मेळघाटाच्या बफर झोनमध्ये 1228 रोपांची लागवड करण्यात आली. या लागवडीबाबत आनंद व्यक्त करताना नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्पाचे कॉन्झर्वेशन आफिसर मुकुंद धुर्वे म्हणाले, 'गेल्या पावसाळ्यात आम्ही 27,456 रोपांची लागवड केली त्यातील 15,355 रोपे 2017च्या मान्सूनपर्यंत व्यवस्थित रुजली. मृत रोपांच्या जागी आम्ही पुन्हा लागवड केली आणि यावर्षी आणखी रोपे लावण्यात आली. यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत 20757 रोपांची लागवड पूर्ण झालेले आहे.'

रोपांची मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्नगवताची तोड तसेच चराईमुळे आणि जळाऊ लाकडाच्या तोडीमुऴे वनाच्छादित क्षेत्रांजवळ मोठ्या प्रमाणात तोड होत असते. आम्ही लावलेल्या रोपांचे आयुष्य वाढावे तसेच त्यांना गुरांपासून हानी होऊ नये म्हणून नियंत्रित चराईबंदीचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले. ठराविक काळामध्ये ठराविक प्रदेशात चराई होऊ नये अशी त्यामागे अपेक्षित आहे.  लावलेली रोपे जगावित म्हणून त्यांना कुंपण घालण्यात तसेच बहुतांश रोपे एखाद्या कुंपणाजवळ, संरक्षक भिंतींजवळ लावण्यात आली त्यामुळे त्यांना एका बाजूने संरक्षण मिळाले. यावर्षी मान्सून येण्यापुर्वी आम्ही गेल्या वर्षी लावलेल्या रोपांचे सर्वेक्षण केले, त्यातून ज्या ठिकाणची रोपे मृत पावली तेथे पुन्हा या वर्षी लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाबरोबर लावलेल्या रोपांची सुरक्षा यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.-किशोर रिठे, सातपुडा फाऊंडेशन

टॅग्स :Indiaभारत