ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 4- केवळ तासाभराच्या मुसळधार पावसाने सोमवारी सायंकाळी दाणादाण उडाली. शहरातील बहुसंख्य रस्ते पाण्याखाली आले होते. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यालगत गटारी तुंबल्याने रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर पाणी साचून होते. रात्री ८.३० वाजेपर्यंत ३४.६ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात चांगला पाऊस झाला आहे. सोमवारी सकाळी आकाशात ढग दाटून आले होते. परंतु कुठे तुरळक सरी सोडल्यास दिवसभर ऊन पडले होते. सायंकाळी ६ नंतर अचानक वातावरण बदलले. काळे ढग दाटून येऊन काही मिनिटातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ही वेळ कार्यालय सुटण्याची असल्याने रस्त्यांवर गर्दी होती. तासाभरातच संपूर्ण रस्ते पाण्याने भरल्याने जागोजागी वाहने अडकून पडली होती.
मुसळधार पावसामुळे नागपुरात उडाली दाणादाण
By admin | Updated: July 4, 2016 22:36 IST