शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

डहाणूत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: June 29, 2016 03:07 IST

तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस कोसळत असून, नदी, नाले, गावतलाव भरभरून वाहू लागले आहेत.

शौकत शैख,

डहाणू- तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस कोसळत असून, नदी, नाले, गावतलाव भरभरून वाहू लागले आहेत. २६ जून २००२ च्या प्रलयाची आठवण करून देत २६ जूनला एकाच दिवशी चक्क २५१ मी.मीटर पाऊस पडला तर २७ जूनला सकाळी उघडीप देईल असे वाटत असतानाच दुपार पासून तुफान पावसाला सुरु वात झाली. मंगळवारच्या सकाळ पर्यंतच्या २४ तासात ११४.६ मी.मीटर पावसाची नोंद झाली तर आठवडा भरात ६५५.३ मी.मीटर, पाऊस पडला हा पाऊस धमणी धरण,कवडास बंधारा आणि साखरे बांधाऱ्यात क्षेत्रातही पडल्यामुळे ते बऱ्यापैकी भरले आहे.सुरवातीलाच पाऊस सुरू होताच उतावीळ होऊन ज्या शेतकऱ्यांनी भाताचे बियाणे पेरले त्यांची मात्र या सतत पडणाऱ्या पावसामुळे पंचाईत झाली आहे. पेरलेल्या भातावर कायमचे पाणी साचून राहिल्याने त्याचे कोंब कुजू लागले आहेत. तर काही दडपून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार भात पेरणीचे संकट ओढावले आहे. या वर्षीही भातशेती वाया जाते की काय ? या चिंतेत शेतकरी सापडला आहे. अद्यापही वेधशाळेने दोन तीन दिवस असाच पाऊस कोसळेल असा इशारा दिल्याने बळीराजाची अवस्था आणखीज बिकट झाली आहे.आज संध्याकाळी झालेल्या तुफानी पावसाने कंक्र ाडीपूल वाणगाव येथील डी.जे फॅक्टरी आणि वरोर येथील बंधारा रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद पडली त्यामुळे अनेक वाहने अडकून पडली होती. व स्थानिकांचेही प्रचंड हाल झाले.>जव्हारमध्ये धुवाँधार ; जनजीवन विस्कळीत; धबधब्यांवर तरुणाई उसळलीगेल्या काही दिवसांपासून रिमझिम बरसणाऱ्या पावसाने शुक्रवार पासून धुवाँधार सुरवात केलेली असून सोमवार पर्यत जोरदार पडणाऱ्या धो-धो पावसाने जव्हार शहराला चांगलेच झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री पासून पडणाऱ्या पावसाने थोडाही वेळ उघडीप दिलेली नसल्यामुळे नागरीक कंटाळून घराबाहेर निघालेले नाहीत. रस्ते ओस पडलेले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र चांगला दिलासा मिळाला आहे. काही शेतकऱ्यांनी नांगरणी करण्यास सुरवातही केलेली आहे.धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे भक्कम बांधलेली स्लॅबची घरेही गळायला लागली आहेत, त्यातून ही पाण्याची धार सुरू आहे. तर खेडो पाड्यातील आदिवासींच्या कुडाच्या, पत्र्यांच्या, कौलाच्या घराचे काय हाल झाले असतील याची कल्पनाच केलेली बरी. जिकडे तिकडे नाले, नद्या, बंधारे भरून वाहू लागले आहेत. खेडोपाड्यातून येणाऱ्या- जाणाऱ्या रस्त्यांवर, मोऱ्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने काही खेडोपाड्यांचा संपर्क तुटला आहे. संततधार सुरू असल्याने शेतकरी ही दुविधेत पडले आहेत. शेतीसाठी पाऊस पाहिजे परंतु तो नियमीत असावा, अशा प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. दरम्यान जव्हार शहर हे पर्यटन स्थळ असल्याने आणि पावसाळ्यात येथे दाभोसा, हिरडपाडा, काळमांडवी, खडखड, हनुमानपॉर्इंट, सनसेट पाँर्इंट, डॅम, जयविलास पॅलेस अशी विविध पर्यटन स्थळे असल्यामुळे पावसाळ्यात येथे असंख्य पर्यटकांची विविध पॉइंटवर गर्दी दिसत आहे. ह्या निर्सगरम्य वातावरणात पर्यटक आनंद लुटत आहेत. तर दुसरीकडे शहरात गटारे तुंबल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.