शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

बंदमुळे मोशी मंडईमध्ये शुकशुकाट

By admin | Updated: July 21, 2016 02:06 IST

नागेश्वरमहाराज भाजी मंडईतील विक्रेत्यांनी शासनाने घेतलेल्या आडत खरेदीदारांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात संप केला.

मोशी : येथील नागेश्वरमहाराज भाजी मंडईतील विक्रेत्यांनी शासनाने घेतलेल्या आडत खरेदीदारांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात संप केला. मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या मोशी भागात नागेश्वर भाजी मंडई हे एकमेव भाजी खरेदी करण्याचे येथील नागरिकांना सोयीचे ठिकाण आहे.येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदीसाठी मोशीतील विविध भागांतील रहिवाशी, नागरिक येत असतात. आज मंडई बंद असल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली. त्यांना भाजीसाठी इतर ठिकाणांचा आधार घ्यावा लागला. काही गृहिणींना घरातील कडधान्यावरच आजचा दिवस भागवावा लागला. मध्यमवर्गीय कुटुंबीयांची ही मंडई हक्काची खरेदीची जागा आहे. ती बंद असल्याने त्यांचे दिवसभराचे नियोजन काहीसे कोलमडले.या निर्णयामुळे सध्या सर्वच ठिकाणी संप, निषेध होत असून, यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. यावर शासनाने योग्य तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. मोशी मुख्य चौकातील नागेश्वरमहाराज भाजी मंडईतील किरकोळ विक्रेत्यांनी आपली दुकाने मंगळवारी दिवसभर बंद ठेवत संप करत शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. हा निर्णय शेतकरी हिताचा नसून, त्यात व्यापारी व शेतकरी दोघेही भरडले जाणार आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांना याचा फटका बसणार असून, त्यांना अधिकची आडत देणे अवघड व अशक्य जाणार आहे. याचा ग्राहकांवरही बोजा पडणार असून, अगोदरच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांवर हा अधिकचा बोजा पडल्यास ते थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करू लागतील. यामुळे आमच्या व्यवसायावर गदा येणार आहे. आमची घरे चालणार कशी, आमच्या उत्पन्नाचे साधनच हिरावले जाईल. निर्णय शेतकरी हिताचा असला, तरी त्यात काही तरतुदी या अन्यायकारक आहेत. यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी मंडईतील विक्रेते करत आहेत. तसेच शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये फेरीवाल्यांना फिरकू दिले जात नव्हते. परंतु आता त्यांना प्रवेश दिला जात आहे. (वार्ताहर) >सलग चौथ्या दिवशीही भाजी मंडईमध्ये शुकशुकाटभाजीविक्रेत्यांनी बंद पाळल्याने चौथ्या दिवशीही च्ािंचवड, आकुर्डी येथील भाजी मंडईमध्ये आजही शुकशुकाट दिसून आला. अनेक गृहिणी भाजीपाला घेण्याच्या अपेक्षेने येत होत्या. मात्र, मंडई बंद असल्याचे पाहून निराश आणि संतप्त मनाने त्या माघारी फिरत होत्या. बेमुदत बंद असल्याने कधीपर्यंत मंडई सुरू होतील, हे सांगता येणार नाही, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. एक-दोन ठिकाणीच हातगाडीवरून भाजी विकत असल्याचे दिसले. त्यांच्याकडून सर्वच प्रकारच्या भाज्यांसाठी अव्वाच्या सव्वा किमती आकारल्या जात होत्या.>ग्राहकांमधून व्यक्त होतोय संतापभोसरी : एरवी नेहमी वर्दळ दिसून येणाऱ्या पिंपरी, आकुर्डी, चिंचवड आणि भोसरी येथील मंडईमध्ये गेल्या चार दिवसांपासून शुकशुकाट आहे. रस्त्यांवर, सोसायट्यांमध्ये आणि गल्लोगल्ली हातगाडी आणि टेम्पोतून भाजी विकण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मंडईला पर्याय म्हणून टेम्पो, हातगाडीवर भाजी मिळत असली, तरी ती चढ्या भावाने दिली जात असल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. मंडईत दहा रुपयांना मिळणारी मेथीची गड्डी २० रुपयाला विक्री होत आहे. दुप्पट, तिप्पट दराने भाजी विक्री होत आहे. गरज म्हणून ग्राहकांना जादा रकमेचा भुर्दंड सोसावा लागत आहे. संत तुकारामनगर येथील मोठ्या गृहप्रकल्पाच्या बाहेर गेल्या दोन दिवसांपासून भाजी विक्रेते टेम्पो घेऊन थांबू लागले आहेत. त्या ठिकाणी आता मंडईचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आठवडा बाजाराच्या निमित्ताने शहराच्या विविध भागात एक दिवसासाठी भाजी विक्रेते येत असत. आंदोलनकर्त्यांनी इतरांनाही भाजी विक्रीस विरोध केल्याने आठवडा बाजारही भरत नाहीत. (प्रतिनिधी)