शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये संताप

By admin | Updated: August 23, 2016 02:35 IST

महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरवासीयांना पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरवासीयांना पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नेरूळ सेक्टर ६ मधील एव्हरग्रीन सोसायटीमध्ये कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याने १३६ कुटुंबीयांची गैरसोय होत असून हा प्रश्न तत्काळ मिटला नाही तर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. चोवीस तास पाणीपुरवठा करणारी एकमेव महापालिका असा नवी मुंबईचा देशभर लौकिक आहे. यासाठी पालिकेने केंद्र शासनाचे पुरस्कारही मिळविले आहेत. मालकीचे धरण असल्याने पुढील ५० वर्षे पाणी टंचाई भासणार नाही असे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात पावसाळ्यातही पिण्यापुरते पाणी उपलब्ध होत नाही. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिमाणसी १३५ लिटरप्रमाणे पाणी पुरविण्याची योजना आखली असून त्याची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये एकूण सदनिका व प्रत्येक सदनिकेमध्ये ५ व्यक्ती गृहीत धरून पाणी सोडले जात आहे. परंतु अनेक सोसायट्यांमध्ये सरासरी १३५ प्रमाणेही पाणी मिळत नाही. याशिवाय सोसायटीच्या टेरेसवरील टाकीतून पाणी सोडले की तळमजल्यावरील नागरिकांना जास्त पाणी मिळते. त्या तुलनेमध्ये वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. या वस्तुस्थितीकडे व तांत्रिक अडचणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. नेरूळमधील एव्हरग्रीन सोसायटीमध्ये १३६ सदनिका आहेत. पालिकेच्या सुधारित नियमाप्रमाणे सोसायटीला रोज ९१८०० लिटर पाणी मिळाले पाहिजे. परंतु १ ते १५ आॅगस्ट पर्यंत १३८० युनिट पाणी मिळणे आवश्यक असताना फक्त ८४८ युनिट पाणी मिळाले आहे. ५३२ युनिट पाणी कमी मिळाले आहे. एव्हरग्रीन सोसायटीमधील पदाधिकारी महादेव पवार यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की उन्हाळ्यामध्ये धरणात पाणी नसल्याचे कारण देवून पाणी कपात करण्यात आली. परंतु पावसाळ्यात धरणातील पाणीपातळीमध्ये वाढ झाली असतानाही नागरिकांना गरजेपुरतेही पाणी मिळत नाही. प्रशासनाने कागदावर केलेले नियोजन बरोबर असले तरी त्यांनी एकदा प्रत्यक्ष नागरिकांशी बोलून वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. स्थानिक नगरसेविका सुजाता सूरज पाटील यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)>महासभेत उमटणार पडसाद युवक राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष सूरज पाटील यांनी सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली आहे. प्रशासन नागरिकांची अडवणूक करत असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले जाणार आहे. एव्हरग्रीनमधील पाणी प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांनी नियमित पाठपुरावा केला असून या समस्येचे पडसाद आता सर्वसाधारण उमटणार असून यानंतरही मार्ग निघाला नाही तर नागरिक हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.