शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

पाणीटंचाईमुळे उडाला ‘हगणदरीमुक्ती’चा फज्जा!

By admin | Updated: May 5, 2016 03:04 IST

प्यायलाच नाही पाणी, शौचालयात कुठून टाकणार? : खारपाणपट्टय़ात तीव्र पाणीटंचाई.

अतुल जयस्वाल/अकोला पाणीटंचाईचे संकट यंदा राज्यात जवळपास सर्वत्रच आहे. हंडाभर पाण्यासाठी मैलोगणती पायपीट करण्याची वेळ नागरिकांवर ओढावली आहे. या पाणीटंचाईचा फटका शासनाच्या हगणदरीमुक्त गावाच्या अभियानालाही बसला आहे. प्यायलाच पाणी नसल्याने शौचालयामध्ये कुठून टाकणार, अशी भूमिका घेत, ग्रामीण भागातील नागरिकांनी आता शौचविधीसाठी पुन्हा 'बाहेर'चा मार्ग पत्करल्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये 'हगणदरीमुक्ती'चा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सन २0१५-१६ या वर्षात अकोला जिल्ह्यातील १६८ गावे हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ठेवले होते. मार्च २0१६ अखेरपर्यंत यापैकी ६८ गावे हगणदरीमुक्त करण्यात यश मिळाले. ग्रामपंचायतींनीही ग्रामस्थांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती करून घरोघरी वैयक्तिक शौचालय बांधण्यास ग्रामस्थांना प्रवृत्त केले. जिल्ह्यात हगणदरीमुक्त अभियानास बर्‍यापैकी प्रतिसाद मिळून ६८ गावे हगणदरीमुक्त घोषित करण्यात आली. गतवर्षी पावसाळय़ात अत्यल्प पाऊस झाल्याने यावर्षी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. जलस्रोत आटल्याने नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली. खांबोरा ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणार्‍या गावांमध्ये तर अभूतपूर्व जलसंकट निर्माण झाले. प्यायला पाणी मिळणेही दुरापास्त झाले. या सर्व बाबींचा परिणाम हगणदरीमुक्त अभियानवर झाल्याचे चित्र या गावांमध्ये दिसून येत आहे. पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे, तिथे शौचालयात टाकण्यासाठी पाणी कुठून आणणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थ शौचविधीसाठी गावाबाहेरील रस्ता, माळरान किंवा नदीकाठाचा वापर करताना दिसून येत आहेत.