शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट कामामुळे गटारावरील स्लॅब तुटला

By admin | Updated: May 19, 2016 03:05 IST

नेरूळ सेक्टर १० मधील तेरणा शाळेसमोर ठेकेदाराने गटाराचे काम निकृष्ट केले असल्याचे निदर्शनास आले

आहे. पीक अप व्हॅनच्या वजनाने गटारावरील स्लॅब तुटल्याची घटना नुकतीच घडली आहे. या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याविषयी चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. नेरूळ सेक्टर १० मधील सारसोळे बस डेपो ते गावदेवी मंदिरापर्यंतच्या पावसाळी गटाराचे बांधकाम महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी केले आहे. ठेकेदाराने जुने गटार तोडून पूर्णपणे नवीन बांधणे आवश्यक होते, परंतु प्रत्यक्षात जुने बांधकाम पूर्णपणे काढले नाही. ठेकेदाराने नियम व अटींप्रमाणे काम केले नाही. गटारावरील स्लॅबही निकृष्ट दर्जाचा केला आहे. महापालिकेच्या अभियंत्यांनी कधीच या कामाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. काम पूर्ण होऊन जवळपास सहा महिने झाले आहेत. या गटारावरून पीक अप व्हॅन तेरणा शाळेमध्ये साहित्य घेऊन जात होती. गटारावरील स्लॅब कोसळल्याने गाडीची चाके गटारात गेली. सुदैवाने यामध्ये कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. पीक अप व्हॅनचे वजनही स्लॅबला पेलवले नाही. तेरणा शाळा व वैद्यकीय महाविद्यालयासमोर हे गटार आहे. येथे नियमितपणे विद्यार्थ्यांची वर्दळ असते. भविष्यात गटाराचा स्लॅब कोसळून विद्यार्थी जखमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने या गटाराच्या कामाची चौकशी करावी. ठेकेदाराने नियमाप्रमाणे काम केले आहे का, कार्यादेश देताना व निविदेमध्ये नमूद केल्याप्रमाणे काम केले आहे का हे पाहावे व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी विविध करांच्या रूपाने दिलेल्या पैशाची ठेकेदारांवर होणारी उधळपट्टी थांबवावी व निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी नागरिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे करणार आहेत.