ठाणे : सोमवारी रात्रीपासून मंगळवार दुपारपर्यंत झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूरमधील रहिवाशांच्या २६ जुलै २००५ रोजीच्या महाप्रलयाच्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या आणि अनेकांच्या काळजाचा अक्षरश: ठोका चुकला. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ५९७ मि.मी. पाऊस झाला.ठाणे जिल्ह्यात २६ जुलै २००५ रोजी ९०० ते ९५० मि.मी. पाऊस झाला होता तर सर्वाधिक पाऊस झालेल्या बदलापूरमध्ये त्यावेळी ११०० मि.मी. पाऊस झाला होता. त्यामुळे सोमवारी रात्रीपासून सुरु असलेला मुसळधार पाऊस अकरा वर्षांपूर्वीचे भय जागे करणारा ठरला. मंगळवारी दुपारनंतर पावसाने अचानक विश्रांती घेतली. अन्यथा २६ जुलैची पुनरावृत्ती झाली असती, असे बोलले जाते. दरम्यान रात्री पुन्हा सरींवर सरी सुरू झाल्या.मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. उपनगरीय गाड्यांची वाहतूक सकाळपासून कोलमडली होती. गाड्या अर्धा तास उशिराने धावत होत्या. अंबरनाथ-बदलापूर दरम्यान मालगाडी रूळावरून घसरल्यामुळे खंडीत झालेली वाहतूक सेवा दुपारनंतर हळूहळू पूर्वपदावर आली. भिवंडीच्या साठेनगर व अंबरनाथ परिसरात घराच्या दोन भिंती कोसळल्या तर उल्हासनगरमध्ये स्लॅब कोसळून एक दुकानदार दगावला. खडवली येथील भातसा नदीत एक तीन वर्षांची मुलगी बुडाली.अंबरनाथ बदलापूरात वाहतूक कोलमडलीअंबरनाथ शहरातील कमलाकर नगर, स्वामीनगर, बी केबिन रोड, कल्याण बदलापूर महामार्ग या भागातील रस्ते पाण्याखाली आले होते. बीग सिनेमासमोर पाणी भरल्याने या ठिकाणची वाहतूक वळविण्यात आली. वडवली येथील मुख्य नाला देखील भरुन वाहत असल्याने हे सर्व पाणी रस्त्यावर आले होते. मोरीवली परिसरात देखील सर्व पाणी रस्त्यावर आले होते. बदलापूरातील उल्हास नदी तसेच स्टेशन परिसरातील मुख्य नाल्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने चिखलोली, कात्रप, शिरगांव, बेलवली आणि वालिवली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली.>कल्याणमधील वन विभागाच्या कार्यालयात पाणीच पाणीबिर्लागेट : मुसळधार पावसामुळे बिर्लागेट, म्हारळ, म्हारळपाडा, सोसायटी यांच्यासह कल्याण पंचायत समिती, तहसीलदार आणि वनविभागाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.म्हारळपाडा, वरप, म्हारळ सोसायटी, राधाकृष्ण नगरी, बोडकेचाळ, प्रिती अॅकेडमी शाळा, ओमकारनगर, टाटापावर हाऊस येथे पाणी भरले. शहाड उड्डाणपूलाजवळ पडलेले खड्डे आणि त्यामध्ये भरलेले पाणी यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वालधुनीची पातळी धोकादायक, शाळांना सुट्टीउल्हासनगर : वालधुनी नदीने धोकादायक पातळी गाठल्याने किनाऱ्यालगतच्या असंख्य घरात पाणी घुसले. मातोश्री रमाबाई आंबेडकर शाळेसह इतर शाळांना सुट्टी देण्यात आली. कॅम्प नं-३, कल्याण-अंबरनाथ रस्त्यावरील स्टेट बँक, शांतीनगर स्मशानभूमी चौक, अनिल-अशोक चित्रपटाबाहेर, खेमाणी परिसर आदी ठिकाणी पाणी तुंबले. टिलसन मार्केटचा काही भाग कोसळल्याने दोन ते तीनजण जखमी.>डोंबिवलीत वीज गायब; पाणी पुरवठा नाहीकल्याण-डोंबिवलीतील अनेक ठिकाणी पाणी साचले होते. डोंबिवलीतील एमआयडीसीमधील नाले तुडुंब वाहू लागल्याने अनेक रस्त्यावर पाणी साचले. डोंबिवली स्थानक भाजी मार्केटमध्ये पाणी साचले होते तर दुपारी ठाकुर्ली एमआयडीसी रोड, मिलापनगर येथे पाणी साचले होते. सागावं, सांगार्ली, नांदवली आणि भोपर येथे नाल्यामधील पाणी रस्त्यावर आणि चाळींमध्ये घुसले होते. कल्याण कोर्टात पाणी साचल्यामुळे वकिलांची चांगलीच तारांबळ उडाली. पूर्वेकडील मानपाड्यासह टाटा पॉवर लाइन परिसरात मध्यरात्री विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे रहिवाश्यांची झोपमोड झाली. मंगळवारी सकाळीही बहुतांशी भागात वीज नसल्याने अनेक सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकला नाही. भिवंडीतील यंत्रमाग थंडावले : मुसळधार पावसाचा यंत्रमाग व्यवसायावर झाला असून यंत्रमाग कामगारांच्या वसाहतीत पाणी शिरले. कल्याणरोड गोपाळनगरच्या दोन्ही गेटवर पाणी साचले होते. नारपोली भागातील गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. सोमवारी रात्री सव्वातीन वाजता हमालवाडा येथील मशिदी जवळील जुने घर कोसळले तर दुपारी एक वाजता साठेनगर येथील मनपा शौचालया जवळील भिंत कोसळली. या दोन्ही घटनांत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.भात पिकासाठी उत्तम पाऊसभात पिकाला समाधानकारक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात भात पिकाचे ६० हजार ११७ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत ३२ टक्के क्षेत्रावर लावणीची कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी दिली.
पावसाच्या रौद्र रुपाने काळजाचा ठोका चुकला!
By admin | Updated: July 20, 2016 04:13 IST