ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ११ - पंचवटी श्री काळाराम मंदिर परिसरातील पुरातन राम लक्ष्मण मंदिराचा (भोलादासजी का मंदिराचा) काही भाग पावसामुळे रविवारी कोसळला. रात्री पावणेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही.