शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद; 5 हजार गरजूंना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 19:02 IST

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्यानं अनेकजण हवालदिल

मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षाचा फटका गरीब आणि गरजूंना बसू लागला आहे. राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्यानं मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे उपचारांसाठी मदत कुठून आणि कशी मिळवायची असा प्रश्न राज्यभरातून मुंबईत आलेल्या अनेकांना पडला आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाबाहेर गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र कक्षच बंद असल्यानं आता जायचं कुठे असा यक्षप्रश्न गरजूंसमोर उभा राहिला आहे. राज्यभरातून आलेल्या गरजूंना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाते. मात्र राष्ट्रपती राजवट लागू असल्यानं मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. 'कार्यालय बंद. चौकशी करू नये', असा मजकूर असलेला कागद कक्षाच्या दारावर चिटकवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमधून मदतीच्या आशेनं आलेल्या अनेकांचा भ्रमनिरास होत आहे. जवळपास ५ हजार जणांना याचा फटका बसला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज शेकडो गरजू मंत्रालयात येतात. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळेल, या आशेनं येणाऱ्या अनेकांना सध्या रिकाम्या हातानं परतावं लागत आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली. पूर, दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्यांना या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. याशिवाय या कक्षाच्या माध्यमातून गंभीर आजारांचा सामना करणाऱ्यांनादेखील अर्थसहाय्य करण्यात येतं. २०१४ पासून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून वैद्यकीय मदत म्हणून ५५० कोटी रुपये देण्यात आलं आहे. याचा लाभ ५६,३१८ रुग्णांना झाला आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019