शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी भात लागवडीला झाला उशीर

By admin | Updated: July 7, 2014 02:59 IST

कोकणच्या सहा जिल्ह्यांपैकी एकट्या ठाणे जिल्ह्याचे पर्जन्यमान सरासरी दोन हजार ४०० मिमी आहे.

सुरेश लोखंडे , ठाणेकोकणच्या सहा जिल्ह्यांपैकी एकट्या ठाणे जिल्ह्याचे पर्जन्यमान सरासरी दोन हजार ४०० मिमी आहे. जून महिन्यात सुमारे ४०० ते ५५० मिमी सरासरी पाऊस पडणाऱ्या या जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी केवळ १५९.६७ मिमी पाऊस पडला आहे. या वर्षी पावसाला सुमारे २४ दिवसांचा उशीर झाल्याने जिल्ह्यातील १९८ गावांना जवळपास अतिरिक्त २७ दिवस पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. तर भातलागवड एक ते दोन आठवडे लांबणीवर गेली आहे.उन्हाळ्यात २०० गावांना ३७ टँकरने पाणीपुरवठा करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पावसाने ओढ घेतली असती तर, टंचाईदेखील वाढत गेली. मात्र, मागील तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे टँकरचा पाणीपुरवठा थांबविण्यात आला आहे. पावसाचा लहरीपणा लक्षात घेऊन फेबु्रवारीत १४ टक्के पाणीकपात महापालिकांना लावण्यात आली होती. ती आजतागायत आहे. १५ जुलैपर्यंत धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण न वाढल्यास त्यानंतर मात्र जास्त पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. एक कोटी २० लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील सर्व महापालिका क्षेत्रात दररोज एक हजार ६२१ दशलक्ष लीटर पाण्याचा वापर होत आहे. गावपाड्यांना दररोज ७.४६ दशलक्ष घनमीटर पाणी लागत आहे. २४ लघुपाटबंधारे आणि सहा केटी बंधाऱ्यांद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तर ५० दशलक्ष घनमीटर पाणी जिल्ह्यातील उद्योगांमध्ये वापरले जात आहे. तर ३०८ दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर या उद्योगधंद्यांमधील कामगारांसाठी केला जात आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आजपर्यंत एक हजार १७७.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. आज भातसा धरणात २७.४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. याशिवाय, मोडकसागरमध्ये ४५.०५ टक्के, आंध्रात २१.३० टक्के बारवी धरणात ११.६६ टक्के सूर्याच्या कवडास व धामणीमध्ये अनुक्रमे ९७.९९ व ४५.७७ टक्के आणि तानसामध्ये ९.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.२ जुलैपर्यंत सरासरी ९२० मिमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. प्रारंभीच्या पावसात शेतकऱ्यांनी भातरोपांसाठी सुमारे ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असता उर्वरित ३० टक्के पेरण्यांचे काम संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात भाताची लागवड पूर्णत्वास येणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील एक लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र या वर्षी खरिपाखाली येणार आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर भाताची लागवड आहे. नागली १५ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावर तर वरी ११ हजार ३२० हेक्टर क्षेत्रात घेतली जात आहे. उर्वरितक्षेत्रावर तूर, मूग, उडीद आणि तीळ, सोयाबीन आदी पिके घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उत्पादनवाढीसाठी ३४ हजार मेट्रीक टन खताचा वापर केला जाणार आहे. लांबलेल्या पावसावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी भातपेरणीवर टँकरद्वारे पाणी फवारणी करून भाताची रोपे वाचवली आहेत.